“अरे मिंध्या आम्ही दिलेलं मत वापस कर”; शिवसेनेच्या आमदारान संजय राऊत यांना डिवचले

कांदा ज्याप्रमाणे रस्त्यावर फेकून दिला आहे त्याच प्रमाणे गुलाबराव पाटलाला फेकला पाहिजे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली होती.

अरे  मिंध्या आम्ही दिलेलं मत वापस कर; शिवसेनेच्या आमदारान संजय राऊत यांना डिवचले
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 10:30 PM

जळगाव : कोण आला रे कोण शिवसेनेचा वाघ आला म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मालेगावत जंगी स्वागत करण्यात आले. ठाकरे गटाच्या मालेगावमधील सभेत ठाकरे गटाचे अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. याच खासदार संजय राऊत यांनीही आमदार गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे यांच्यावर जहरी टीका करत कांद्यासारखे गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकायचे आहे अशी सडकून टीका त्यांनी त्यांच्यावर केली होती. तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आमदार सुहास कांदे यांच्यावर खोक्यावरून टीका केली होती. त्यामुळे आता ठाकरे गट आणि शिवसेना पुन्हा एकदा आमने सामने आली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मालेगावमधील सभेत आमदार गुलाबराव पाटील, आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर आता नाशिक उत्तर महाराष्ट्रासह इतर ठिकाणचे राजकारण तापले आहे.

त्यामुळे आता मालेगावची सभा झाल्यानंतर शिवसेनेतील नेत्यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर आता गुलाबराव पाटील यांनीही त्यांच्यावर पलटवार केला आहे.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना माझ्यावर त्यांनी टीका कार करावी लागते कारण त्याचा अर्थ मी छोटा माणूस नाही. त्यामुळेच संजय राऊत यांच्यासारख्या माणसांकडून आपल्यावर टीका केली जाते असा टोला त्यांनी संजय राऊत यांंना लगावला आहे.

ज्या झाडाला फळ आहेत त्याच झाडाला दगड मारला जातो. त्यामुळे संजय राऊतलाही माहिती आहे मला फळं अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी टीका करताना त्यांच्यावर राज्यसभेवर आमच्यामुळे निवडून गेल्याचे सांगत ते म्हणाले की, अरे मिंध्या पाहिले आम्ही दिलेलं मत वापस कर मग गुलाबराव पाटलांवर टीका कर असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

कांदा ज्याप्रमाणे रस्त्यावर फेकून दिला आहे त्याच प्रमाणे गुलाबराव पाटलाला फेकला पाहिजे अशी टीका त्यांनी त्यांच्यावर केली होती.

त्यावर गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे की, मला कांद्याप्रमाणे रस्त्यावर फेकण्याआधी आम्ही तुम्हाला केलेली मत आधी आम्हाला परत कर नाही तर तोच कांदा आता तुझ्या तोंडावर हाणून मारेल असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....