Eknath Khadse : मी मित्रत्वाचे नाते जपले, त्यांनी मात्र कुभांडच रचले; खडसेंची फडणवीसांवर टीका

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांच्या राजकीय (Political) जीवनात माझी मोलाची मदत झाली होती. मात्र याचा त्यांना विसर पडला. दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया है, अशी गाण्यातून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी टीका केली आहे.

Eknath Khadse : मी मित्रत्वाचे नाते जपले, त्यांनी मात्र कुभांडच रचले; खडसेंची फडणवीसांवर टीका
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 2:03 PM

मुक्ताईनगर (जळगाव) : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांच्या राजकीय (Political) जीवनात माझी मोलाची मदत झाली होती. मात्र याचा त्यांना विसर पडला. दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगी भर के लिये बदनाम किया है, अशी गाण्यातून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी टीका केली आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या सक्षम करण्यात माझा मोलाचा वाटा आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस मागच्या 5 टेबलच्या नंबरवर बसत होते. मीच माझ्याजवळ घेऊन फडणवीस यांना बसवले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

‘देवेंद्र फडणवीसांनी रचले कुभांड’

खडसे पुढे म्हणाले, की विधानसभेत वारंवार देवेंद्र फडणवीस यांना बोलण्याची संधी मी त्यांना दिली. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यास सर्वांचा नकार होता. मुंडे साहेबांच्या आग्रहास्तव मी त्यांना संमती दिली, तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष झाले. त्यामुळे मी मित्रत्वाचे नाते जोपासले. मात्र त्यानंतर त्यांनी माझ्यामागे एक षड्यंत्र, कुभांड रचले. मुख्यमंत्रीपदावरून मला मागे ठेवण्यात आले. यावरूनच एक गाणे मला एका कार्यक्रमात आठवले. दुश्मन ना करे दोस्त ने ऐसा काम किया है, जिंदगीभर मुझे बदनाम किया, असे टोले त्यांनी यावेळी लगावले.

‘उत्तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्रीपदासाठी एकमेव नेता’

मला अभिमान आहे, की मी तरी मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत उत्तर महाराष्ट्रातला एकमेव नेता म्हणून पोहोचलो होतो. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी षडयंत्र रचले. एकाच पक्षात असूनही माझे फोन टॅप करण्याचा नीचपणा, हलकटपणा फडणवीस यांनी केला, हे अत्यंत घृणास्पद असल्याचेही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी यावेळी महागाई, इंधन दरवाढीवरून सरकारला लक्ष्य केले. गिरीश महाजन यांच्यावरही त्यांनी यावेळी टीका केली.

आणखी वाचा :

Sanjay Raut : एकाच पक्षाच्या नेत्यांना ‘दिलासा’ कसा मिळतो, संजय राऊत यांचे न्यायालयाच्या निर्णयावर पुन्हा प्रश्नचिन्ह, सोमय्या प्रकरणावर संतप्त

Silver Oak Attack Audio Clip : चला भाऊ मीडिया आली, शरद पवारांच्या घरावरील आंदोलन प्रकरणातील दोन आरोपींचं संभाषण उघड, संदीप गोडबोलेला ऐकलं का?

Raut on Somaiya: स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात, राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.