भ्रष्टाचाऱ्यांचा नवीन नारा, तुरुंगात जाण्यापेक्षा भाजप बरा…; शरद पवार गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
NCP Leader Jayant Patil on BJP : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. जळगावमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी हे मोठं विधान केलं आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या तोडफोडीवरही जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...
किती भ्रष्टाचार असावा याचा आता सुमार राहिलेला नाही. मात्र भ्रष्टाचारावर कोणी बोलत नाही. आता भ्रष्टाचाऱ्यांकडून नवीन नारा दिला जात आहे. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेलं बरं… कारण भाजपमध्ये गेल्या तर सर्व चौकशा थांबतात. त्यामुळे मागे लागलेल्या सर्व कटकटी थांबतात. आमच्या 25 नेत्यांवर तुम्हीच आरोप केलं. अंतर 23 जणांच्या चौकश्या थांबल्या. राज्यातली जनता दूध खुळी आहे का? या सरकारने गेल्या दीड ते दोन वर्षात महाराष्ट्रात खूप मोठ्या भ्रष्टाचार केलेला आहे. मात्र तो लोकांना जावून सांगण्याची गरज आहे. महायुतीच्या सरकारचे काळे कारनामे असे पुस्तक आम्ही प्रसिद्ध केलेला आहे. ते पुस्तक लोकांमध्ये जाऊन लोकांना वाचून दाखवा, असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
शिंदे सरकारवर निशाणा
लोकसभेच्या निकालानंतर हे सरकार प्रचंड भेदरलेले आहेत. राज्यावर मोठे कर्ज आहे. मोठा बोजा आहे. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा प्रचंड बोजवरा या सरकारने उडवला आहे. पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असणारा आपला राज्य आता थेट 11 वय क्रमांक वर गेला आहे. डबल इंजिन मुळे आम्हाला पैसे मिळतात असं सरकार सांगतात. मात्र हे डबल नाही तर लोकांना त्रास देणाऱ्या ‘ट्रबल इंजिन’ आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
शेतकरी प्रश्नावर भाष्य
शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्यातल्या विमा कंपन्या करत नाही. निर्यातीच्या चुकीच्या धोरणाचा फटका हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर बसला. पिकांना हमीभाव नाही यासह विविध समस्यांमुळे शेतकरी नाराज असल्याने त्याचा फटका सरकारला लोकसभा निवडणुकीत असल्याचा आपण बघतो आहे. मुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी मोठ्या घोषणा केल्या मात्र आजही आपल्या राज्यातला शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या मोदी सरकारला अपयश आलेला आहे. त्यामुळे देशात बेरोजगारीचा उच्चांक हा गाठलेला आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
विशाळगडावर ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम या दोघा समाजाचा या ठिकाणी अतिक्रमण आहे. पावसाच्या आधी किंवा नंतर अतिक्रमण काढायला होतं. मुस्लिम लोकांना बेदमपणे मारहन करण चुकीचा आहे. या घटनेचा निषेध केला आहे. निवडणुका असल्याने राज्यात हिंदू आणि मुस्लिम लोकांचा ऐक्य बिघडेल असा प्रयत्न काही लोक करत आहेत, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.