Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा त्यांना अयोध्या दौरा महत्वाचा वाटला; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीची सडकून टीका

राज्यातील शेतकरी सध्या संकटात आहे. मात्र त्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आणि त्यांना अवकाळी पावसाच्या अडचणीतून बाहेर काढण्याआधी शिंदे गटाला अयोध्या दौरा करणं महत्वाचं वाटलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा त्यांना अयोध्या दौरा महत्वाचा वाटला; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादीची सडकून टीका
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 6:31 PM

जळगाव : राज्यातील शेतकरी अवकाळी आणि गारपीटीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांवर अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी आता करायचे काय असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे सरकार मात्र शेतकऱ्यांच्या अडीअडचणीकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील काही आमदारांनी नुकताच अयोध्या दौरा केला आहे. तर त्याच वेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता.

तरीही काही आमदार आणि मंत्री अयोध्या दौऱ्यावर गेले.त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. तर त्यावरूनच आमदार एकनाथ खडसे यांनी अयोध्या दौऱ्यावरून आमदारांवर टीका केली आहे.

तर दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीदीवरून शिवसेनेला छेडण्याचा प्रयत्न केला होता. बाबरीची ढाचा पाडण्यात आला त्यावेळी शिवसेनेचा सहभाग नव्हता असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावरूनही एकनाथ खडसे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अशी वक्तव्य करणं म्हणजे मूर्खपणाचे आहे असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

एकनाथ खडसे यांनी सरकारवर निशाणा साधताना म्हणाले की, बाबरी मशीद आंदोलनात माझाही सहभाग होता. त्यावेळी मीही 15 दिवस तुरुंगवास भोगला होता.

बाबरी मशिदीच्या आंदोलनात शिवसेनेचा सहभाग कमी असला तरी त्यावेळी चंद्रकांत पाटील सोडून भाजपमधील देवेंद्र फडणवीस हे त्या आंदोलनात सहभागी होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

बाबरी आंदोलनावरून आता शिवसेनेला छेडणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अशी विधानं करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यातील शेतकरी सध्या संकटात आहे. मात्र त्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे आणि त्यांना अवकाळी पावसाच्या अडचणीतून बाहेर काढण्याआधी शिंदे गटाला अयोध्या दौरा करणं महत्वाचं वाटलं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.