“बाबरी पाडली त्याचा मी साक्षीदार, तेव्हा कोण होतं,नव्हतं मला माहितीय”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सगळा इतिहास सांगितला

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विनायक राऊत, खासदार संजय राऊत या नेत्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

बाबरी पाडली त्याचा मी साक्षीदार, तेव्हा कोण होतं,नव्हतं मला माहितीय; राष्ट्रवादीच्या नेत्यानं सगळा इतिहास सांगितला
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 3:51 PM

मुक्ताईनगर/जळगाव : मुख्यमंत्री अयोध्येचा दौरा करून आल्यापासून राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना आणि ठाकरे गट, तर दुसरीकडे भाजपनेही ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. अयोध्या दौऱ्याचं राजकारण संपतं न संपतं तेच आता बाबरी मशिदीचं राजकारण सुरू करण्यात आले आहे. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीवरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना छेडल्यानंतर आता हे वातावरण अधिकच चिघळले आहे. त्यामुळे आता भाजप आणि ठाकरे गटाच्या या वादात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी मारली आहे. त्यामुळे आता बाबरी मशिदीवरून चाललेल्या आरोप प्रत्यारोपावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना सांगितले की, बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणीही शिवसैनिक म्हणून नाही तर हिंदू म्हणून होते.

आणि विश्व हिंदू परिषद सगळ्यांचं नेतृत्व करत होती असं मत व्यक्त केले होते. त्यावरूनच भाजप आणि ठाकरे गट आता आक्रमक झाला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विनायक राऊत, खासदार संजय राऊत या नेत्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

मात्र आता चंद्रकांत पाटील यांचे कधी काळचे सहकारी असलेले मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले आहे.

आमदार एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, मीही कार सेवक म्हणून दोन वेळा अयोध्येला गेलो होतो.

त्याचवेळी पोलिसांचा मारही मी खाल्ला होता. तर त्यानंतर पंधरा दिवस मीही तुरुंगवास भोगला होता अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे.

आयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी जी बाबरी मशीद तोडली होती. त्याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्यावेळी दोन वेळा मी कार सेवक म्हणून अयोध्येमध्ये गेलो होतो. त्याप्रकरणी त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मारही मी खाल्लेला आहे.

त्यामुळे यामध्ये कोण होतं कोण नव्हतं हे मला माहित आहे असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटलांना त्यांनी लगावला आह. कारण मी दोन्ही वेळा गेलो होतो.

तसेच त्याकाळात पंधरा दिवस मी तुरुंगामध्येही थांबलो होतो अशा घटनाघडामोडींचा इतिहासही त्यांनी यावेळी सांगितला आहे.

त्यामुळे मला माहित होतं की कोण कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी होते, असा टोला लगावत या विषयावर अधिक न बोललेलं बरं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.