राज्याच्या राजकारणात संस्कार आणि संस्कृतीही राहिली नाही, या नेत्यांनी व्यक्त केली खंत

शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आता अशी स्पर्धा लागली आहे की, कोण अधिक महिलांचा अपमान करेल असं मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

राज्याच्या राजकारणात संस्कार आणि संस्कृतीही राहिली नाही, या नेत्यांनी व्यक्त केली खंत
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 9:00 PM

जळगावः सध्या महाराष्ट्राचे राजकारण अनेक वेगवेगळ्या मुद्यामुळे चर्चेत आले आहे. नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्याही फैरी झडत आहेत. नुकतेच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे शिंदे गटासह नेत्यांवर जोरदार टीका झाली होती. त्या प्रकरणाविषयी राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी बोलताना खंत व्यक्त केली.

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेल्याचं मी कधीही अनुभवलं नव्हतं. तसेच राज्याच्या राजकारणात आता संस्कारही राहिले नाहीत आणि संस्कृतीपण राहिलेली नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कारण नुकतेच अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याबद्दल राज्यातील राजकीय संस्कृतीविषयीही त्यांनी खेद व्यक्त केला.

अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर आणि शिंदे गटावरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्याविषयी माफी न मागता सारवासारव केल्यानेच आमदार एकनाथ खडसे यांनी राज्यातील राजकीय संस्कृती बदलते असल्याचे मत व्यक्त केले.

आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी सांगितले की, शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये आता अशी स्पर्धा लागली आहे की, कोण अधिक महिलांचा अपमान करेल, कोण महिलांच्या बाबतीत अपमानकारक शब्द वापरले अशी त्यांच्याबद्दल त्यांनी टिप्पणीही केली आहे.

आपण मंत्री आहोत, समाज आपल्याकडे अपेक्षेने पाहतो आहे हे जबाबदारीचं भान न ठेवता, टीका टिप्पणी होते आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाला डाग लागत असल्याची खंत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.