भर मंचावर एकनाथ खडसे यांच्या हातातून माईक खेचला, जळगावात धक्कादायक प्रकार!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या हातातून भर मंचावरुन माईक खेचल्याचा प्रकार समोर आलाय.
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या हातातून भर मंचावरुन माईक खेचल्याचा प्रकार समोर आलाय. संबंधित प्रकारामुळे मंचावर असलेल्या इतर नेतेमंडळी आणि पदाधिकारी देखील आवाक झाले. संबंधित व्यक्तीला पदाधिकाऱ्यांनी लगेच बाजूला केलं. संबंधित व्यक्ती हा त्यांच्या पक्षाचाच कार्यकर्ता होता, अशी माहिती समोर येतेय.
जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिजेएनटी मेळाव्यात संबंधित प्रकार घडला. संबंधित घटना ही कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झालीय. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
संबंधित प्रकार घडल्यानंतर त्या कार्यकर्त्यावर एकनाथ खडसे त्यांच्या शैलीत बरसतात.
“जसजशी संध्याकाळ होते तसतशी घरी जायची घाई होते. एका बाजूला घरी जायचं असतं तर दुसऱ्या बाजूला तिकडे जायचं असतं. हम तो बंजारा है. हमने तो अभीतक नहीं छोडी”, असं एकनाथ खडसे म्हणाले.
“मी निवडणुकीत तुम्हाला पाहिलं. एक-दोन किलो मटन, मटनाची वाटी आली की हो गया कारभार”, असा टोला त्यांनी कार्यकर्त्याला लगावला.