देवेंद्र फडणवीस नव्या युगातील जनरल डायर…; शरद पवार गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत

Rohit Pawar on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस नव्या युगातील जनरल डायर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

देवेंद्र फडणवीस नव्या युगातील जनरल डायर...; शरद पवार गटाच्या नेत्याचं विधान चर्चेत
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 7:35 AM

देवेंद्र फडणवीस अभिमन्यू आहेत का नाही आहेत? हे मला माहित नाही. मात्र या नव्या युगातले ते जनरल डायर मात्र नक्की आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना फोन करून जालन्यातील उपोषण करणाऱ्यांवर लाठीचार्ज करायला सांगितला. वारकरी संप्रदायाच्या लोकांना सुद्धा यांनी सोडलेले नाही. त्यामुळे अतिशय चुकीच्या प्रवृत्तीचे हे लोक आहेत. त्यामुळे महायुतीचे नेत्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, असं रोहित पवार म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सभा झाली. या सभेत रोहित पवार बोलत होते.

गिरीश महाजनांवर निशाणा

जामनेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.  गिरीश महाजन आमदार झाले मंत्री झाले मात्र मंत्री झाल्यानंतर त्यांनी तुमच्यासाठी काय केलं? मोठ मोठी खाती त्यांच्याकडे होती. जलसंपदा खात त्यांच्याकडे होतं. मतदारसंघ शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम झाला असता. काय विकास केला त्यांनी? काल-परवा मी एक व्हीडिओ बघितला, दुचाकीवर बसले होते पण चिखलातून त्यांना जाता आलं नाही. एखाद्या नेत्याचे जर अशी परिस्थिती असेल तर सर्वसामान्यांचे काय?, असा सवाल रोहित पवार यांनी केला.

‘संकटमोचक’वरून टीकास्त्र

आरोग्यामध्ये मोठं काम केल्याचं ते नेहमी सांगतात. मात्र आरोग्याची सेवा देण्यासाठी बाहेर का घेऊन जातात? याच ठिकाणी असे एखादी मोठा हॉस्पिटल का तयार झालं नाही? महाजन हे संकट मोचक नेते आहेत असं म्हणतात. मात्र संकट कोणाचं सोडवतात, तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर संकट आलं तर ते संकट सोडवतात. संकट मोचक नेते आहे. तुमचं वजन आहे. मग का म्हणून शेतकऱ्यांना अनुदान आलं नाही? सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुमची वजन का वापरत नाही? हा माझा प्रश्न आहे, असं रोहित पवार म्हणाले.

तुमच्या तालुक्यामध्ये गिरीश भाऊंनी काही उद्योग आणले का? डिग्री घेऊन तरुणांच्या हाताला काम नाही. सरकार महाराष्ट्र आयोगाच्या परीक्षांमध्ये सुद्धा मोठ्या भ्रष्टाचार करतात तलाठी भरतीसाठी तर एकेक जणांकडून 35 35 लाख रुपये घेतले. देवेंद्र फडणवीस यांना मागच्या दरवाजातून कॉन्ट्रॅक्ट भरती केली.. 27 हजार कॉन्टॅक्टमध्ये भरती केली कोणाला दिला तर आपल्या भाजपच्या लाडक्या आमदाराला… गोडाऊन भरून भरून पैसा ठेवलेला आहे आणि हा पैसा आपल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीमध्ये वापरला जाऊ शकता. कितीही पैसा आला तरी आपल्या लाडक्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला विजय करायचा आहे, असं म्हणत फडणवीसांवर रोहित पवारांनी निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.