….तर गॅरंटी मोदींची आहे, मुद्रा लोनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरला हुंकार

Modi Guarantee : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगाव दौऱ्यावर आहेत. लखपती दीदी या कार्यक्रमानिमित्ताने त्यांनी महिला बचत गटाशी आज संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महिलांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सर्वात आघाडीवर असल्याचा दावा केला. त्यांनी या कार्यक्रमात मोदी गॅरंटीचा हुंकार भरला.

....तर गॅरंटी मोदींची आहे, मुद्रा लोनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरला हुंकार
हीच मोदी गॅरंटी
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 2:22 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावमध्ये लखपती दीदी कार्यक्रमासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षातील महिला विकासाचा आलेख दाखवत विरोधकांना आरसा दाखवला. त्यांनी यावेळी महिला बचत गटांशी संवाद साधला. महिलांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आपले सरकार सर्वात आघाडीवर असल्याचे ते म्हणाले. त्यांनी या कार्यक्रमात मोदी गॅरंटीचा पुन्हा हुंकार भरला. काय म्हणाले पंतप्रधान…

सात दशकांचा हिशोब काय?

काहीही झालं तरी माझ्या देशातील महिलांच्या प्रत्येक संकटाला कमी करेलच हे मी ठरवलं. त्यामुळे मोदी सरकारने एकानंतर एक महिला हिताचे निर्णय घेतले. मी आव्हान देतो. आधीच्या सरकारचे सात दशक एका तराजूत ठेवा आणि दुसऱ्या तराजूत मोदी सरकारचे दहा वर्ष ठेवा. एवढं काम मोदी सरकारने देशाच्या आयाबहिणीने केलं आहे. स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार एवढं काम कोणत्याच सरकारने केलं नाही, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.

हे सुद्धा वाचा

महिलांच्या नावे घर

गरीबांचे घर सरकार बनवते. ते महिलांच्या नावाने नोंदणी झाले पाहिजे याचा निर्णय घेतला. चार कोटी घरे बांधले. त्यातील सर्वाधिक घरे महिलांच्या नावे आहेत. आता तीन कोटी घरे बांधणार आहोत. त्यातील सर्वाधिक घरे महिलांच्या नावे असतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिले. लोकसभेनंतर नरेंद्र मोदी यांचा हा पहिला जळगाव दौरा आहे. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांनी हजेरी लावली.

तर मोदीची गॅरंटी आहेच

त्यानंतर आम्ही बँकांशी संबंधित कामे केली. आधी जनधन खातं उघडलं. सर्वाधिक खाते महिलांचे उघडले. नंतर मुद्रा योजना सुरू केली. बँकांना सांगितलं तर विना गॅरंटीचं लोन द्या. गॅरंटी हवी तर मोदी आहे. या योजनेचा ७० टक्के महिलांनी लाभ घेतला आहे. काही लोक देशात होते, ते म्हणायचे महिलांना असं लोन देऊ नका. बुडेल. त्यात रिस्क आहे. पण मी वेगळा विचार करायचो. माझा तुमच्यावर मातृशक्तीवर इमानदारीवर आणि कर्तृत्वार पूर्ण भरोसा आहे. महिलांनी मेहनत केली आणि त्यांनी इमानदारीने कर्ज फेडले. आता मुद्रा योजनेची मर्यादा २० लाखावर नेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.