“खडसेंनी माझ्यावर मकोका लावून चांगलं काम केलंय”; भाजप-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप
मकोकामुळे आता जळगावचे राजकारण तापले आहे, त्यामुळे भविष्यात हे राजकीय युद्ध कुठं थांबणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
जळगाव : राज्यातील राजकारणात अनेक घटना घडामोडी घडत असताना जळगाव जिल्ह्यातही महाजन आणि खडसे वाद उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत ईडी आणि मकोका कायदा एकमेकांना का लावले त्यावरून आता दोघांमध्ये वाद रंगला आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर मकोका लावल्यानंतर तो का लावला हेही त्यांनी महाजन यांना त्यांनी ठणकावून सांगितले होते.
गिरीश महाजन यांनी माझ्यामागे माझ्या चौकशीसाठी सर्व यंत्रणा लावल्या होत्, ईडीची चौकशी लावली, सीबीआय चौकशीही सुरु केली होती. या एवढ्या चौकशा लावूनही महाजन यांच्याकडून माझ्यावर मकोका का लावण्यात आला असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता असं त्यांनी स्पष्टपणे त्यांना विचारले होते.
तू माझ्यामागे ईडी लावली म्हणून मी तुझ्या मागे मोकोका लावला असंही खडसे यांनी त्यांना ठणकावून सांगितले होते. त्यावरून राज्याच्या राजकारणात जोरदार खळबळ उडाली होती. तर त्यावरूनच आता गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ खडसे यांनी डिवचले आहे.
गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर बोलताना सांगतिले की, त्यांनी माझ्यावर मकोका लावून चांगले काम केले आहे. तरीही एकनाथ खडसे यांचे काही लपून राहिले नाही. माझ्यावर मकोका लावण्यात आला असला तरी ईडी आणि सीबीआयमुळे सगळ्या गोष्टी आता समोर आल्या आहेत. त्यांनी माझ्यावर मकोका लावताना त्यांनी हे कबूल केले आहे की, माझ्यावर हा मकोका मुद्दापणे लावण्यात आला आहे. मात्र तरीही खऱ्या आणि खोट्या गोष्टी आता समोर आल्या आहेत.
त्यांच्यामुळेच त्यांच्या जावयालाही तुरुंगात जावं लागले आहे असा टोलाही एकनाथ खडसे यांना महाजन यांनी लगावला आहे. त्यांनी माझ्यावर मकोका लावला मात्र एकनाथ खडसे यांच्यावर मी आरोप केलेले नव्हते तर अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर आरोप केले होते, त्या खडसेंच्या विरोधात गेल्यामुळे त्यांची चौकशी झाली होती असंही गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.
आता माझ्यावर ते काहीही आरोप करत असले तरी न्यायालयाने थांबवल्यामुळे खडसेंचे कुटुंबीय आता बाहेर आहेत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. मकोकामुळे आता जळगावचे राजकारण तापले आहे, त्यामुळे भविष्यात हे राजकीय युद्ध कुठं थांबणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.