शरद पवारांचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मराठा आरक्षणावर भाष्य; म्हणाले….

Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवला जाऊ शकतो? यावर भाष्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

शरद पवारांचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मराठा आरक्षणावर भाष्य; म्हणाले....
शरद पवार, प्रकाश आंबेडकरImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 3:35 PM

रत्नागिरीतील चिपळूणमध्ये बोलताना शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. जरांगेंची मागणी योग्य आहे. त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे, असं शरद पवार म्हणाले होते. त्यावर जळगावमध्ये बोलताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी रत्नागिरीच्या सभेत प्रत्यक्षपणे सांगितलं की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे असं स्पष्ट सभेत त्यांनी सांगितलं. त्यामुळे अनेक ओबीसी संघटनांनी शरद पवार यांचा निषेध केला. ओबीसी आणि मराठा समाजात आता दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे ओबीसी समाज आरक्षण विरोधी तर मराठा समाज आरक्षणाच्या बाजूने झाला आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

मनोज जरांगेंची मागणी योग्य आहे. असं म्हणत पाठिंबा शरद पवार यांनी रत्नागिरीच्या सभेत दिला. याबाबत वंचितची भूमिका अशी आहे की, ओबीसींचं आरक्षण हे त्यांचं त्यांना राहिलं पाहिजे. मराठा समजाला वेगळं आरक्षण द्यावं. आरक्षणाचा मुद्दा हा वेगळा होत चालला आहे. सामान्य जनतेचे प्रश्न जे आहेत. ते प्रश्न कुठेतरी मागे पडत आहेत. अशी परिस्थिती आगामी निवडणुकीची आहे. आघाड्यांचं राजकारण सुरू राहील. पण एका मुद्यावरती सर्व पक्ष कॉमन आहेत. ते म्हणजे आरक्षण कायमच संपलं पाहिजे या मुद्द्यावर हे सगळे एक आहेत मात्र वंचित आघाडी ही रस्त्यावर उतरून आरक्षण वाचविण्याचे धोरण घेईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर टीका

भाजपचे आमदार नितेश राणे हे वारंवार वादग्रस्त विधान करत आहेत. त्यावर आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिलीय. नितेश राणे यांना सरकारचा पूर्ण पाठिंबा असल्याचे दिसत आहे. म्हणून ते असं वक्तव्य त्या ठिकाणी करत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत आपण बघितलं तर महाराष्ट्रात 32 ठिकाणी हिंदू मुस्लिम यांच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला. मात्र एकंदरीत असे दिसते की, महाराष्ट्रातली जनता ही आता दंगल करण्याच्या मनस्थितीत नाही, असं आंबेडकर म्हणालेत.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ धोरणावरही प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. यावर जेव्हा चर्चा झाली. त्यावेळी देशाच्या एकजुटीला बाधा होऊ शकते. म्हणून हे रिजेक्ट झालेलं आहे. हे भाजप आणि आरएसएसने पुन्हा एकदा लोकांवर लादण्याचं ठरवलं आहे. यामुळे देश विघटनेच्या मार्गावर आहे असं आम्हाला वाटतं, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.