SC final decision on MLA Lata Sonawane : आधी जातपडताळणी प्रमाणपत्रावरून आणि आता शिंदे गटात सहभागावरून आमदारकी धोक्यात

Supreme Court final decision on MLA Lata Sonawane disqualification case : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. या निकालात १६ आमदार अपात्र होणार की नाही, याचाही निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे.

SC final decision on MLA Lata Sonawane : आधी जातपडताळणी प्रमाणपत्रावरून आणि आता शिंदे गटात सहभागावरून आमदारकी धोक्यात
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 1:36 PM

मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या, 11 मे रोजी लागणार आहे. अशावेळी शिंदे गटातील १६ आमदार अपात्र होऊ शकतात. या १६ आमदारांपैकी महत्त्वाचे एक नाव म्हणजे लता सोनावणे. लता सोनावणे यांची आमदारकीची ही पहिली टर्म आहे. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा येथून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकून आल्या. लता सोनावणे यांना २० हजार ५२९ मतं मिळाली. लता सोनावणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश वळवी यांना पराभूत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.

या १६ आमदारांच्या पात्रतेवर होणार निर्णय

राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल उद्या सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. या निकालात १६ आमदार अपात्र होणार की नाही, याचाही निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे.

हे सुद्धा वाचा

या सोळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.

आमदार सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीने दिला. याबाबतची तक्रार जगदीश वळवी आणि अर्जुनसिंग वसावे यांनी जातपडताळणी समितीकडे केली होती. समितीच्या आदेशाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रीट याचिका दाखल केली.

टोकरे कोळी अनुसूचित जमातीच्या असल्याचा दावा त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी आमदारकी अडचणीत आली आहे. त्यात आता शिंदे गटात सहभागी झाल्याने त्या पात्र राहणार की नाही, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

LIVE Updates Supreme Court Decision on 16 MLA Disqualification Case Maharashtra | Shiv Sena | Eknath Shinde

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.