Sachin Tendulkar Letter : पत्र लिहिण्यास कारण की…सचिन तेंडुलकरचं जळगावच्या अनयला पत्र, काय म्हणाला सचिन वाचा….
जळगावमधील डोहाळे कुटुंब चार महिन्यापूर्वी मुंबाईला फिरायला आलं होतं. मुंबई दर्शन करणाऱ्या गाईडनं सचिन तेंडुलकर याचं घर त्यांना दाखवलं.
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याला भेटायला कुणाला आवडणार नाही. सचिन तेंडुलकरच्या घरासमोर त्याला पाहण्यासाठी गर्दी जमलेली असते. चाहते तो दिसला की तिथं त्याला समोरासमोर पाहण्यासाठी प्रयत्न करत असतात. सचिनही त्याच्या चाहत्यांना नेहमी खूश करताना दिसतो. सचिननं त्याच्या अनेक चाहत्यांसोबत प्रत्यक्ष देखील संवाद साधताना दिसून येतो. सचिनने त्याच्या चिमुकल्या चाहत्याला असंच एक पत्र (Letter) लिहिलयं. ते पत्र सध्या चांगलंच चर्चेत आलंय. जळगावमधील (Jalgaon) इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या अनय डोहाळेनं हे पत्र मास्टर ब्लास्टरनं लिहिलंय. या पत्रात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागलीच असले. हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डोहाळे कुटुंब आनंदी
जळगावमधील पहिल्या वर्गात शिकणाऱ्या अनय डोहाळे यानं हे पत्र सचिनला लिहिलं होत. त्यावर सचिनने देखील पत्रातून उत्तर दिलं आहे. तो लिहितो की, ‘मोठी स्वप्न बघ, खूप मेहनत कर, तुला यश मिळेल,’ असा सल्ला सचिन तेंडूलकर याने या पत्रातून दिलाय. सचिन तेंडूलकरने पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला थेट पत्र लिहिल्याने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलाय. या पत्रासोबत सचिन तेंडुलकरनं स्वतःची सही आणि विश्वचषक हातात घेलेले दोन फोटोही पाठविले आहे. डोहाळे कुटुंबीय हे सचिनचं पत्र पाहून खूप आनंदी झाले आहे.
का पाठवलं पत्र?
सचिनला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी दूरवरुन लोक येत असतात. असंच जळगावमधील डोहाळे कुटुंबिय चार महिन्यापूर्वी मुंबाईला फिरायला आलं होतं. मुंबई दर्शन करणाऱ्या गाईडनं सचिन तेंडुलकर याचं घर त्यांना दाखवलं. यावेळी अनय डोहाळं या चिमुकल्यानं सचिन तेंडुलकरचं घर पाहताच त्यानं त्याला भेटायचा आग्रह धरला. आई- वडिलांनाही त्यानं तसं सांगितलं. मात्र, कोणीही त्याच्या घरी जाऊन सहज भेटू शकत नाही. मग यावर आता काय करायचं असा प्रश्न डोहाळे कुटुबियांना पडला. यातच त्यांनी सचिनला पत्र पाठवायचं ठरवलं. अनयच्या हस्ते सचिला वाढदिवसानिमित्त पत्र लिहून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर ते हा विषय पूर्णपणे विसरले देखील होते. यातच चार महिन्यानंतर सचिनने स्वतःची सही असलेलं पत्र अनयला पाठवलं. यात त्याला भरपूर शुभेच्छा देत मेहनत करण्याचा सल्लाही दिला. पत्राचं उत्तर येईल अशी अपेक्षा नसताना सचिनने त्याला पत्र लिहून उत्तर पाठवल्यानं डोहाळे कुटुंबियांना खूप आनंद झालाय. मला उत्तर पाठविल्यानं खूप आनंद झाला आहे, असं अनय डोहाळे सांगतो.