अधिवेशनात वेगवेगळ्या घोषणा होतील, मात्र…; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा शिंदे सरकारवर निशाणा
Rohini Khadse on Maharashtra Aseembly Session 2024 : राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी विधिमंडळ अधिवेशनावरून सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सेलच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनावर भाष्य केलं आहे. त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. महायुतीचे सरकारचे शेवटचा अधिवेशन आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये वेगळी प्रलोभन दिली जातील. वेगवेगळ्या घोषणा केल्या जातील. वेगवेगळे योजना या माध्यमातून जाहीर करण्याचा प्रयत्न करेल. कारण हे शेवटचे अधिवेशन आहे. घोषणा अंमलात आणला जाणार नाहीत. मात्र शेवटचा अधिवेशन असल्यामुळे लोकांना प्रलोभन देण्याचे काम केलं जाईल. अधिवेशनाचा उपयोग केवळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी सरकार करेल असं मला वाटतं, असं रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.
अधिवेशनात वेगवेगळ्या घोषणा योजना जाहीर होतील मात्र अंमलात आणल्या जाणार नाही. फक्त लोकांना प्रलोभने दिली जातील, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर रणनीती आणि नियोजन जर तुम्हाला आताच सांगितलं तर आम्हाला निवडून यायला अडचणी होतील, असं म्हणत विधानसभेच्या रणनितीच्या प्रश्नावर रोहिणी खडसे म्हणाल्या.
जिल्हा बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर भाष्य
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज पार पडली. या बैठकीतील मुद्द्यांवरही रोहिणी खडसे यांनी भाष्य केलंय. भविष्यात विधानसभा निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जायचं या पद्धतीने बैठकीत चर्चा झाली. लोकसभेच्या दोन्ही जागा आम्ही असलेलो आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मकतेची भावना पसरली आहे. ती दूर करण्याबाबत हे बैठकीत चर्चा झाली, असं रोहिणी म्हणाल्या.
जळगाव जिल्हा शरद पवारांच्या पाठीशी नेहमी राहिलेला आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून येतील. आमच्या उमेदवारांना मत कमी पडली ती मतं का कमी पडली याचा प्रत्येकाने अभ्यास केला आहे ..मार्ग काढणं आणि त्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये सामोरे जायचे या विषयावर बैठक झाली, असं म्हणत रोहिणी खडसे यांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांना बदाम का पाठवले?
मुलींना मोफत शिक्षण देण्याबाबतची चंद्रकांत पाटील यांनी जी घोषणा केली होती. त्या गोष्टीची त्यांना आठवण यावी यासाठी संपूर्ण राज्यातून त्यांना बादाम पाठवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेचा कागद आणि त्यासोबत एक बदाम अशा पद्धतीने जवळपास एक लाख बदामांची पाकीट ही पोहोचलेली आहेत, अशी माहितीही रोहिणी खडसेंनी दिली.