हप्ते खाणाऱ्याला हप्तेच समजतात…संजय राऊत यांच्यावर शिंदे गटातील या नेत्याची बोचरी टीका, म्हणाले, निश्चितच कोणत्याही ठिकाणी डोके मोजली जातात

Sanjay Raut : तीन वर्षांपूर्वी राज्यात 50 खोके आणि एकदम ओके हा शब्द परवलीचा झाला होता. त्यानंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. पण शिवसेनेतील दोन्ही गटातील कडवटपणा काही कमी झालेला नाही. 5 कोटी सापडल्यानंतर संजय राऊत यांनी शहाजीबापूंवर टीका केली तर आता त्यांच्यावर या नेत्याने टीका केली आहे.

हप्ते खाणाऱ्याला हप्तेच समजतात...संजय राऊत यांच्यावर शिंदे गटातील या नेत्याची बोचरी टीका, म्हणाले, निश्चितच कोणत्याही ठिकाणी डोके मोजली जातात
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 4:27 PM

राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर काय डोंगर, काय झाडी आणि 50 खोके आणि एकदम ओके हा शब्द परवलीचा झाला होता. त्यानंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. पण शिवसेनेतील दोन्ही गटातील खदखद काही कमी झालेली नाही. दोन्ही गट संधी मिळताच एकमेकांवर तुटून पडतात. त्यात काल पुण्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी सापडल्यानंतर संजय राऊत यांनी सांगोल्यातील शहाजीबापू यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. आता जळगावमधून गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

हप्ते खाणाऱ्यालाच हप्ते समजतात

पुण्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनात 5 कोटी रुपये सापडले. त्यानंतर विरोधकांनी शहाजीबापूकडे मोर्चा वळवला. संजय राऊत यांनी पोलिसांच्या मदतीने रक्कमा पोहचवल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला. मते विकत घेण्यासाठी हा खटाटोप करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. केवळ एक गाडी दाखवण्यात आली इतर गाड्या आणि त्यातील रक्कमा कुठे आहेत, असा सवाल पण त्यांनी केला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर पण टीका केली.

हे सुद्धा वाचा

त्यांच्या या आरोपानंतर निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली तर आता खानदेशमधील शिंदे सेनेचे शिलेदार गुलाबराव पाटील यांनी पण त्यांच्यावर निशाणा साधला. 5 कोटींची रक्कम सापडली आहे. आणि 50 कोटी कसे आणि कुठून येतील. काय कमाल आहे, असा सवाल त्यांनी केला. हप्ते खाणाऱ्याला हप्तेच समजतात, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील संजय राऊत यांना लगावला आहे.

डोकी मोजली जातात

घड्याळ चिन्हावर दावा करणारी शरद पवरा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याप्रकरणात मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. निश्चितच कोणत्याही ठिकाणी डोके मोजली जातात. लोकप्रतिनिधी जास्त आहे, त्यांनाच चिन्ह मिळत असतं. आपण एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत पहिलम असेल किंवा अजित दादा यांच्या बाबतीत पाहिले असेल. त्यांनी विचारधारा सोडलेली नाही. लोकप्रतिनिधींची संख्या पाहिजे आणि ती मजबूत असल्यामुळे त्यांना चिन्ह मिळालं हे मागच्यावेळी सिद्ध झालं होतं आणि आता सुप्रीम कोर्टाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.