सुवर्णनगरीत इतक्या कोटींची उलाढाल, ग्राहकांची झाली तोबा गर्दी
Jalgaon Gold | दिवाळीत सोने-चांदीची जळगाव सराफा बाजारात जोरदार उलाढाल झाली. जळगावमध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर शेजारील राज्यातूनही ग्राहक खरेदीसाठी येतो. यंदा दसऱ्याला पण बाजारपेठ फुलली होती. धनत्रयोदशीला पण चांगली खरेदी झाली होती. या पाच दिवसांत इतक्या कोटींची उलाढाल झाली.
किशोर पाटील, जळगाव | 12 नोव्हेंबर 2023 : दिवाळीत सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानण्यात येते. या काळात देशभरातील सराफा पेठा गजबजलेल्या असतात. ग्राहकांची बाजारपेठेत गर्दी असते. सोन्यात वाढ करण्याची भारतीयांची प्रथा आहे. सर्वत्र देशात जळगावची सुवर्ण नगरी म्हणून ओळख आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या दिवाळीत सोने खरेदीत 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली. या शुभ मुहूर्तावर, पाच दिवसांमध्ये सुवर्णनगरीमध्ये गर्दीचा उच्चांक झाला. ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी केली. सोने खरेदीत 200 कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याची माहिती जळगाव जिल्हा सराफ व्यावसायिक असोसिएशनचे स्वरूप लूंकड यांनी दिली आहे.
सुवर्णनगरीचा मोठा वाटा
देशातील सोने खरेदीच्या एकूण उलाढालीत या सुवर्णनगरीचा मोठा वाटा आहे. गेले दोन ते तीन वर्ष कोरोनाचा काळ होता. त्याचा परिणाम सुवर्ण बाजारावर दिसून आला. उलाढाल हवी तशी झाली नाही. मात्र यंदा सुवर्णनगरीमध्ये चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर सोने खरेदीमध्ये 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली. दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुवर्णनगरीत 200 कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाली.
बाजारात खेळता पैसा
गेल्या वर्षापेक्षा यंदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तरीही खरेदीत वाढ झाल्याची प्रामुख्याने दोन ते तीन कारणे असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यंदा पावसाने नाराज केले. पण नोकरदार वर्गाचा पगार , बोनस तसेच सातवा वेतन आयोगचे पैसे हातात पडले आहेत. त्यामुळेच सहाजिकच सोने गुंतवणुकीकडे नागरिकांचा कल वाढला. महाग असले तरी सोने खरेदीचा ट्रेंड कमी झाला नाही. यंदा ग्राहकी वाढल्यामुळे सुवर्ण व्यावसायिकांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे यंदा दिवाळीत सोने खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसात सुवर्णनगरीत 200 कोटींपेक्षा जास्त उलाढाल झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.
किंमती मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.