तुमच्यासाठी कायपण! पत्नीने चक्क पतीला लिव्हर दिलं, वाचा अनोख्या प्रेमाची जबरदस्त लव्हस्टोरी
जळगावात चक्क एका महिलेने आपल्या पती परमेश्वराला वाचवण्यासाठी स्वतःचे लिव्हर दान करून व्हॅलेंटाइन डे (Valentine day) साजरा करणाऱ्या आधुनिक काळातील पिढीसमोर प्रेमाचा अनोखा आदर्श ठेवलाय.

जळगाव : प्रेमासाठी (Love) वाट्टेल ते अस आपण अनेकदा ऐकल असेल. एक दुजे के लिये, जिना मरना तेरे संग हे चित्रपटही आपल्याला आठवणीत असतीलच. पण चित्रपटातलं प्रत्यक्ष आयुष्यात घडू शकतं हे म्हटल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. जळगावात चक्क एका महिलेने आपल्या पती परमेश्वराला वाचवण्यासाठी स्वतःचे लिव्हर दान करून व्हॅलेंटाइन डे (Valentine day) साजरा करणाऱ्या आधुनिक काळातील पिढीसमोर प्रेमाचा अनोखा आदर्श ठेवलाय. आपले टीव्ही नाईनचे (Tv9) जळगाव जिल्हा प्रतिनिधी अनिल केर्हाळे आणि शारदा केऱ्हाळे या दाम्पत्याची ही कहाणी ऐकली तर मन सुन्न होतं आणि अंगावर शहारे उभे राहतात. लग्नानंतर अनिल केर्हाळे आणि शारदा केर्हाळे या दाम्पत्याला मुलगा व मुलीगी झाली. सर्व काही सुरळीत सुरू होत, मात्र एकेदिवशी केर्हाळे कुटुंबावर संकट कोसळलं. 22018 मध्ये अनिल केर्हाळे यांची अचानक प्रकृती बिघडली. जळगावातील डॉक्टर क्टरांकडे तपासण्या केल्यावर लिव्हरचा मोठा प्रॉब्लेम असल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रियेसाठी अनिल केर्हाळे यांना मुंबईला हलविण्याचा सल्लाही कुटुंबीयांना दिला.
लिव्हर देऊन नवऱ्याला जीवदान
डॉक्टरांनी लिव्हर मिळाले तर अनिल केर्हाळे जगतील नाही तर त्यांचा मृत्यु अटळ असे सांगितले. हे ऐकुन शारदा केर्हाळे यांच्या पायाखालची जमीन सरकली.या सर्व दवाखाने उलथेपालथी केली. मात्र लिव्हर मिळाले नाही. अखेर आपले कुंकू वाचवण्यासाठी शारदा केर्हाळे पुढे सरसावल्या. तपासणीअंती शारदा यांचे लिव्हर अनिल केर्हाळे यांना देता येईल असे डॉक्टरांनी सांगितले. 2 जुलै 2018 ही तारीख केर्हाळे आहे कुटुंबातील कुणीही विसरणार नाहीत. याच दिवशी लिव्हर ट्रान्सप्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. आणि अनिल केर्हाळे यांना जीवनदान मिळाले. पत्नीने दिलेल्या लिव्हरमुळे अनिल केर्हाळे आज सुखरुप आहेत. आजही तो दिवस आठवला की अंगावर शहारे उभे राहतात. माझ्या लिव्हर पेक्षा जास्त माझ्या पतीची माझ्यासाठी मोठी किंमत आहे. आज ते माझ्यासमोर सुखरूप आहेत. यापेक्षा दुसरा काय आनंद. देवाचे खूप खूप आभारी आहे. असे सांगताना आजही शारदा केर्हाळे यांचा ऊर भरुन येतो. पती सुखरूप डोळ्यासमोर असल्याने रोजच माझा व्हॅलेंटाइन दिवस असतो. असेही त्या सांगतात
एक आगळीवेगळी प्रेम कहानी
आज मी जिवंत आहे ते फक्त माझ्या पत्नीमुळे. तिच्यामुळेच मला पुन्हा आयुष्य मिळालं. पत्नीसाठी पती परमेश्वर असतो. मात्र माझ्यासाठी माझा जीव वाचवणारी पत्नी ही परमेश्वराच्या जागी आहे. हे सांगताना अनिल केर्हाळे यांच्या डोळ्यात आजही पाणी येतं. प्रेमाच्या आपण अनेक कहाण्या ऐकल्या असतील. मात्र केऱ्हाळे दाम्पत्य पती पत्नीची प्रेमाची कहाणी काही वेगळीच आहे. या दाम्पत्याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि प्रत्येकाला शारदा केऱ्हाळे आणि अनिल केर्हाळे यांच्यासारखा जीवाला जीव देणारा साथीदार मिळो, प्रेम मिळो याच व्हॅलेंटाइन डेच्या सर्वांना शुभेच्छा.