शिवसेना कोणाची हे पाकिस्तानही सांगेल पण मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

काही लोकांना वाटलं होतं की ते म्हणजेच शिवसेना. अरे हट! म्हणे सभेत घुसणार. अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत.

शिवसेना कोणाची हे पाकिस्तानही सांगेल पण मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही, उद्धव ठाकरे यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 8:36 PM

जळगाव : उद्धव ठाकरे यांनी जळगावातील पाचोरा येथे सभा घेतली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव, बघिनी आणि मातांनो. हा सगळा जल्लोष आणि उत्साह पाहिल्यानंतर शिवसेना कोणाची? हे दिसतंय ना? पाकिस्तानला विचारलं की शिवसेना कोणाची तर पाकिस्तानही सांगेल. पण आमच्याकडे मोतीबिंदू झालेल्या निवडणूक आयोगाला दिसत नाही. त्यांचा दोष आहे. त्यांचा धृतराष्ट्र झाला असेल. पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे त्यांनी ओळखलं नसेल. आता सुषमा ताईंच्या स्टाईलमध्ये बोलायचं तर ही घोषणा अजिबात दिलेली नाही, याची पोलीस आणि पत्रकारांनी घ्यावी, असंही ठाकरे यांनी सांगितलं.

शेपट्या धरून आपटायच्या आहेत

काही लोकांना वाटलं होतं की ते म्हणजेच शिवसेना. अरे हट! म्हणे सभेत घुसणार. अशा घुशी आम्ही खूप पाहिल्या आहेत. पण निवडणुकीच्या रिंगणात अशा घुशी खोदून, शेपट्या धरुन राजकारणात आपटायच्या आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना लगावला.

हे सुद्धा वाचा

गेलेल्या गद्दारांना काही वाटत नाही

40 गद्दार गेले तर काही वाटत नाही. पण आर ओ तात्या यांच्या निधनाने खूप वाईट वाटलं. आर ओ तात्या यांनी वैशाली ताई यांची जी ओळख त्यावेळी सांगितली तेव्हा कळलं नव्हतं. पण आज वैशाली ताई यांनी ती ओळख दाखवून दिली, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

गुलाबो गँग कोण?

वैशाली ताई यांनी एक पाकिट दाखवलं. त्यामध्ये बुरशी आहे. ती मातीत टाकली की पीक कसदार येतं. चांगलं पीक आल्यानंतरही त्याला कीड लागली तर त्याला मारण्याचं औषध ही आर ओ तात्या यांनी हातात देवून ठेवलेली आहेत. कारण कसता तुम्ही, निवडणूक आल्यावर तुम्ही प्रचार करता, तुम्ही मरमर राबता, आणि हे पिकोजी वरती बसतात, त्यांना संजय राऊत गुलाबो गँग म्हणतात, असा टोला त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर लगावला.

भगव्यावरील कलंक धुवायचा आहे

यांना वाटतं आपण घोड्यावर बसलो. घोड्यावर बसल्यावर घोड्याच्या लाथा तुम्ही खायच्या आणि तुम्ही आरामात बसायचं हे आता नाही चालणार. जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी आपल्या भगव्याला कलंक लावला तो कलंक धुवायचा आहेच. पण तो कलंक लावणारे हात ही राजकारणात कायमचे गाढून टाकायचे आहेत. या गर्दीला नुसता अर्थ नाही. लोकं आता बोलायला लागले आहेत, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.