आईच्या कुशीवर वार करणारी औलाद आमची असू शकत नाही, उद्धव ठाकरे यांनी सुनावलं

आज बहिणाबाई असत्या तर त्यांनाही या सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं. बहिणाबाई किती सोप्या भाषेत बोलून गेली.

आईच्या कुशीवर वार करणारी औलाद आमची असू शकत नाही, उद्धव ठाकरे यांनी सुनावलं
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 9:08 PM

जळगाव : उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, यांना वाटतं आपण घोड्यावर बसलो. घोड्यावर बसल्यावर घोड्याच्या लाथा तुम्ही खायच्या आणि तुम्ही आरामात बसायचं हे आता नाही चालणार. जसं घोड्यावर चढवलं होतं ना, तसं आता खाली पुन्हा खेचण्याची वेळ आली आहे. निवडून दिलेले गद्दार झाले पण निवडून देणारे आजही माझ्यासोबत आहेत. उलट्या पायाचं सरकार आहे. हे सरकार अवकाळी आलं. हे सरकार म्हणजेच संकट आहे. एका तरी संकटात यांनी केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर सांगा. एक शेतकरी मला भेटला, कवी आहे. त्यांना मंचावर आणू शकतो. पण कारवाई केली जाते, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, अंबादास यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या. आज कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडला आहे. मंत्री म्हणतील अरे घरामध्ये पडलाय ना कर गाधी आणि झोप त्याच्यावर. आम्ही कसे कापसाच्या गादीवर झोपतो? पण तसं नाहीय ते. आपलं सरकार होतं त्यावेळी जागतिक संकट होतं. नैसर्गिक चक्रीवादळही येत होते. पण अशा संकटावेळी सरकारने मदत केली होती की नाही?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा

तर टाहो फोडला असता

शेतकऱ्याने त्याच्या व्यथेला शब्दांकन करुन टाहो फोडला तर त्याला अटक कराल. झाल्या असतील तुमच्या वाऱ्या तर या आता बांधावरी, तुमचं सगळं चांगलं असेल ओकेमधी. पण माझ्या कापसाला भाव किती, हे विचारणारा शेतकरी. या शेतकऱ्याला मी मुद्दाम इथे आणलं नाही, असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं.

त्याला नेक म्हणू नये

तशीच एक आपली बहीणाबाई, खान्देशाची बहिणाबाईचं नाव ऐकलंय का? आज बहिणाबाई असत्या तर त्यांनाही या सरकारने तुरुंगात टाकायला कमी केलं नसतं. बहिणाबाई किती सोप्या भाषेत बोलून गेली. मोठमोठे जे पंडित समजावू शकत नाही ते ती अशिक्षित बाई सोप्या भाषेत बोलून गेली. ती सोप्या भाषेत म्हणाली, जो इमानाले विसरला त्याला नेक म्हणू नये, जलमं दात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये. याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.

तशी औलाद आमची असू शकत नाही

हे जन्मदात्याला भोवणारे सगळे गद्दार. मगाशी घोषणा दिली की, कोण आला रे कोण आला, गद्दारांचा बाप आला. नाही रे बाबा, मी अशा गद्दारांचा बाप नाही. अशी घाणेरडी औलाद आपली असूच शकत नाही. पाठीवरती सोडाच पण आईच्या कुशीवर वार करणारी औलाद आमची असू शकत नाही. भाषण ऐकून आपण मोठे झालो. काही लोक बाप बदलतात तर काही बाप चोरतात, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.