बकालेला वाचवतंय कोण? तर सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर यापुढे कोणत्या तोंडाने कारवाई करणार?

बकालेला वाचवण्याचा प्रयत्न करणारा हा अधिकारी आयपीएस अधिकाऱ्यांना कामाचं स्वातंत्र्य देत नसल्याचीही चर्चा आहे.

बकालेला वाचवतंय कोण? तर सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर यापुढे कोणत्या तोंडाने कारवाई करणार?
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 10:25 AM

जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, यांनी एका जातीबद्दल अतिशय घृणास्पद , सामाजिक सलोखा बिघडवणारं, अशांतता निर्माण करणारं, समाजात तेढ निर्माण करणारं कथित वक्तव्य केलं. या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, जळगाव जिल्ह्यात वातावरण बिघडलं होतं.पोलीस दलात काही अधिकाऱ्यांच्या डोक्यात जातीयवाद आहे, हे दिसून आलं.पण पोलीस दलाची प्रतिमा अशा एका घटनेने मलीन होणार नाही, या अधिकाऱ्यावर तात्काळ काहीतरी कारवाई होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती. पण तसं झालं नाही. उलट या प्रकरणात यानंतर ज्या प्रकारे घटना घडत गेल्या, यावरुन किरणकुमार बकाले यांना वाचवण्यासाठी एक वरिष्ठ अधिकारी काम करतोय, तो वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय, आयजीच्या जीवावर बायजी उदार, या म्हणीप्रमाणे जळगावात चर्चा आहे.

किरणकुमार बकाले यांच्या नावाने कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर, दुसऱ्या दिवशी वातावरण तापलं, हे वातावरण शांत करण्यासाठी नाशिकचे आयजी बी जी शेखर यांनी एक पत्र काढलं. या पत्रात बकाले यांना निलंबित करण्यात आल्याचं सांगितलं, पण मागणी बडतर्फीची होत होती. बकाले याची चौकशी आयपीएस अधिकारी करतील असं सांगितलं, पण कोण हा आयपीएस अधिकारी, यांचं नाव अजून समोर आलेलं नाही, तर चौकशी कशी झाली असेल, किंवा होईल याचा अंदाज येतो.

बकालेला निलंबित केल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण टीम बरखास्त करुन नव्याने बनवणे आवश्यक होती, पण तसं झालं नाही.या उलट किरणकुमार बकालेच्या जागी एसपी डॉ. प्रवीण मुंडे यांनी ज्यांची नियुक्ती केली, त्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली, हे का , केलं जात आहे, याची उत्तरं जळगावात नाहीत, तर नाशिकमध्ये असल्याची चर्चा आहे.

या दरम्यान बकालेने पळ काढला तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. बकाले हा फरार झाला. बकालेची निलंबनानंतर नाशिक नियंत्रण कक्ष देण्यात आला, पण तिथेही तो उपस्थित नाही, पण त्याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला, त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेपूर वेळ देण्यात आला.

संबंधित अधिकारी महाजन ज्यांच्याशी बकालेने हे घृणास्पद संभाषण केलं होतं, त्यांनी आपला मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला केली. महाजन यांचा मोबाईल गहाळ झाला असेलही, बकाले फरार असेलही, पण संभाषणाची क्लिक समाज माध्यमांवर आहे, बकाले आणि महाजन यांच्या आवाजाचे नमुने अनेक जणांशी संभाषणादरम्यान रेकॉर्ड आहेत.

संबंधित ऑडिओ क्लिप संबंधित कुणीही चुकीचा अहवाल दिला, तर तो अधिकारी अडचणीत येईल हे नक्की.महाजन यांच्याकडून कळत नकळत पणे ही क्लिक पोलीस दलात व्हायरल झाली असेलही, पण त्यांना निलंबनाची शिक्षा का देण्यात येत आहे. बकालेच्या विरोधात जाल तर निलंबन होईल, असा चुकीचा संदेश पोलीस दलात गेला आहे.

जळगावचे पोलीस अधिक्षक डॉ.मुंडे यांनी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसाठी पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची नियुक्ती केली. पण येथेही एसपी मुंडे यांच्या निर्णयाला आव्हान दिल्यासारखंच झालं. नाशिकचे वरिष्ठ अधिकारी जळगाव अशांत होईल, लोकांचा उद्रेक होईल याची वाट पाहतायत का असा सवाल विचारला जात आहे.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.