आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याने टेन्शन वाढवलं?, शाळा, कॉलेज, आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद!

जालना जिल्ह्यात आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये, आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिलेत. (Jalna Collector on Corona Spread)

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्याने टेन्शन वाढवलं?, शाळा, कॉलेज, आठवडी बाजार 31 मार्चपर्यंत बंद!
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 12:04 PM

जालना: राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात मंगळारी 6218 कोरोना रुग्ण आढळले तर 5869 जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेय. तर, दुसरीकडे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिलेत. (Jalna District Collector has ordered to shut schools, colleges, coaching classes & weekly markets till 31 March due to corona spread)

31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालयं बंद

जालना जिल्ह्यात मगंळवारी 117 रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना समितीची महत्वाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. तर, 31 मार्चपर्यंत निर्बंध कायम राहणार असल्याचं जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी म्हंटलंय.कोरोना प्रतिबंधक कायद्याच्या अमंलबजावणीसाठी पथकांची स्थापना करण्यात आलीय.

जालन्यात मंगळवारी 117 नवे रुग्ण

जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटरमधील 18 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जालना जिल्ह्यात मंगळवारी 117 रुग्ण आढळले. आरटीपीसीआरद्वारे 106 व्यक्तींचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 11 असे एकुण 117 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

  1. जालना तालुक्यातील जालना शहर (57), कडवंची (3), काकडा (1), देवगांव (1), परीकल्याण (1), बुटेगाव (1), इंदेवाडी (1)
  2. मंठा तालुक्यातील मंठा शहर (1),
  3. परतूर तालुक्यातील परतूर शहर (1)
  4. अंबड तालुक्यातील अंबड शहर(1)
  5. बदनापूर तालुक्यातील विलाडी (1)
  6. जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर (1), घाणखेडा (1) सावरखेडा (3), टेंभुर्णी (3) निमखेडा (2),
  7. भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी (28),
  8. इतर जिल्ह्यातील बुलडाणा 9,बीड (1)

संबंधित बातम्या:

Maharashtra Corona Update : राज्याची चिंता वाढली, दिवसभरात 6 हजार नवे कोरोना रुग्ण; आकडा वाढला, निर्बंधही वाढणार?

लोकलच्या फेऱ्या कमी होणार का, मुंबईत लॉकडाऊन होणार? पालकमंत्री अस्लम शेख म्हणतात…..

(Jalna District Collector has ordered to shut schools, colleges, coaching classes & weekly markets till 31 March due to corona spread)

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.