मनोज जरांगे अन् देवेंद्र फडणवीसांची फोनवरून चर्चा; काय बोलणं झालं?

Manoj Jarange Patil and Devendra Fadnavis Phone : मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा झाली. या दोघांमध्ये काय चर्चा झाली? याबाबत जरांगेंनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं. लाडकी बहीण योजनेवरही मनोज जरांगेंनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

मनोज जरांगे अन् देवेंद्र फडणवीसांची फोनवरून चर्चा; काय बोलणं झालं?
देवेंद्र फडणवीस, मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 3:37 PM

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार अंतरवालीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फोनवरून जरांगे आणि फडणवीसांचं बोलणं करून दिलं. तेव्हा या दोघांमध्ये मराठवाड्यातील नुकसानीवर चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही. शेतकरी चारी बाजूने संकटात सापडला, त्यांचे हाल होत आहेत. हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून त्या मुद्द्यावर चर्चा झालं, असं जरांगे म्हणाले.

फडणवीसांशी फोनवरून काय चर्चा?

देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना आठ दिवसात मदत द्या, असं मी त्यांना बोललो. तुम्ही मदत देत असताना म्हणत असाल, आठ दिवसांनी देतो, दहा दिवसांनी देतो आणि देताना दोन वर्षांनी देतात. तर तुम्हाला शेतकरी पाडल्या शिवाय सोडत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलताना आरक्षणावर चर्चा झाली नाही. शेतकरी चारी बाजूने संकटात सापडला, त्यांचे हाल होत आहेत. हा विषय महत्त्वाचा वाटला म्हणून त्या मुद्द्यावर चर्चा झाल. आठ दिवसात मदत द्या असं मी त्यांना बोललो. तुम्ही मदत देत असताना म्हणत असाल, आठ दिवसांनी देतो, दहा दिवसांनी देतो आणि देताना दोन वर्षांनी देतात. तर तुम्हाला शेतकरी पाडल्या शिवाय सोडत नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

घोंगडी बैठकीवर जरांगे काय म्हणाले?

घोंगडी बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार आहे. सग्या सोयऱ्याचे अंमलबजावणी कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेट विद्यार्थ्यांचे प्रश्न या या विषयावरही उघडी बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. घोंगडी बैठकीमध्ये कुठल्याही राजकारणाचा समावेश नाही. विधानसभेचा संबंध तुमचा फायनल विषय झाल्यावर होईल. लढायचे की पाडायचे ज्या दिवशी ठरेल त्या दिवशी राजकारणाचा विषय होईल, असं जरांगेंनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोण किती लबाड बोलते हे कॅबिनेट बैठक झाल्यावर कळेलच. शेतकऱ्यांचा कानावर सरसगट शब्द गेलेला आहे आणि शेतकऱ्यांची कोणीही फसवणूक करू शकत नाही. त्यांनी शेतकऱ्यांना फसवले, हे समजायचं की शेतकरी त्यांना फसवणार आहेत. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मिळणारा निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला असेल तर ही वाईट घटना आहे. मग सरकार खूप वाईट चाल खेळत आहे, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.