जालना ते जळगाव आता 3 तासांत गाठता येणार, नव्या रेल्वे मार्गाची काय आहे योजना

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रासाठी रेल्वेने मंजूर केलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या नव्या 174 किमीच्या मार्गिकेला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिलेली आहे. त्यामुळे सिल्लोड सारख्या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे.

जालना ते जळगाव आता 3 तासांत गाठता येणार, नव्या रेल्वे मार्गाची काय आहे योजना
Jalna to Jalgaon New Railway Line at a Glance
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 4:33 PM

रेल्वेच्या अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्रातील जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गासह देशातील सात राज्यातील 14 जिल्ह्यात एकूण आठ नव्या रेल्वे मार्गिकांसाठी एकूण 24,657 कोटी रुपयांना मंजूरी दिली आहे. या आठ मार्गिका येत्या 2030-31 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गिकेमुळे ऐतिहासिक अंजठा येथील लेण्या आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहेत. जालना ते जळगाव हे अंतर कापण्यासाठी पूर्वी पाच तास लागायचे आता याच प्रवासासाठी तीन तास लागणार आहेत.

देशातील सर्वात मोठा बोगदा

जालना ते जळगाव या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गावर 23.5 किमीचा बोगदा खणण्यात येणार असून हा देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे.या नव्या रेल्वे मार्गामुळे अंजठा लेण्यांना पाहायला जाणाऱ्यांना रेल्वेने जाता येणार आहे. त्यामुळे येथील पर्यटनात वाढ होणार आहे.या 174 किमीच्या नव्या रेल्वे मार्गिकेसह आठ नव्या प्रकल्पांना गेल्या शुक्रवारी केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.

पर्यटनाला मोठी चालना

जालना ते जळगाव या 174 किमीच्या रेल्वे मार्गावर अंजठाच्या डोंगरात बोगदा खणण्यात येणार आहे. हा बोगदा आतापर्यंत सर्वात मोठा रेल्वे बोगदा ठरणार असून त्यांची लांबी 23.5 किमी इतकी असणार आहे. या प्रकल्पामुळे येथील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.हा 7,106 कोटी रुपयांच्या या जालना ते जळगाव रेल्वे मार्गामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या तटवर्ती भागातील कनेक्टिव्हीटी वाढणार आहे.त्यामुळे येथील औद्योगिक विकासाला देखील चालना मिळणार असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

935 हेक्टर जमीनीचे संपादन

या नव्या रेल्वे मार्गामुळे जालना ते जळगाव हे अंतर 336 किमीवरुन 174 किमीवर पोहचणार आहे. त्यामुळे हे अंतर जवळपास 50 टक्क्यांनी कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी 935 हेक्टर जमीनीचे संपादन करावे लागणार आहे.या रेल्वे मार्गाचे काम जमीन संपादन केल्यानंतर चार ते पाच वर्षांनी पूर्ण होण्याची आशा आहे. या प्रकल्पामुळे 60 लाख मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती होणार आहे. तसेच कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 54 कोटी किलोग्रॅम कमी होणार आहे.ते 2.2 कोटी झाले लावण्याच्या बरोबर असणार आहे असे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

केंद्र आणि राज्य यांचा समान निधी वाटा

जालना ते जळगाव रेल्वे मार्गिकेसाठी केंद्र सरकारकडे भाजपाचे नेते रावसाहेब दानवे करीत होते. हा प्रकल्प केंद्र आणि राज्य यांच्या 50-50 टक्के निधीच्या सहभागातून पूर्ण होणार असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. हा रेल्वे मार्ग जालना, राजूर, भोकरदन, सिल्लोड, गोळेगाव, अजंठा, फरदापूर आणि जळगाव असा जाणार असून येथील विभागाच्या विकासासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

इतकी जमीन लागणार

अजंठा लेण्यांना पाहण्यासाठी कोणताही जवळचा रेल्वे मार्ग नव्हता. जालना – जळगाव रेल्वे मार्गामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असून वाणिज्य आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या नव्या रेल्वे मार्गासाठी जळगाव येथील 389 हेक्टर जमीन संपादन करावी लागणार आहे. तर उर्वरित जमीन जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून संपादीत करावी लागणार आहे.

सिल्लोडचा औद्योगिक विकास होणार

सध्या मराठवाड्याला जाणाऱ्या ट्रेन सचखंड एक्सप्रेस जळगाव ते मनमाड अशी मध्य रेल्वेच्या मार्गाने प्रवास करीत नंतर दक्षिण मध्य रेल्वेच्या हद्दीतून जालनाला जाते. जळगाव ते जालना जाण्यासाठी सध्या पाच तास लागतात. परंतू नवा रेल्वेमार्ग तयार झाल्यास हे अंतर अवघ्या तीन तासात कापता येणार आहे अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने दिली आहे. या प्रकल्पामुळे सिल्लोड सारख्या सोयाबीन, कापूस आणि साखरेची निर्मिती करणाऱ्या भागातील औद्योगिक विकास होणार आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ठ असलेल्या अजंठाच्या लेण्यांना पाहण्यासाठी रेल्वेचा मार्ग देखील उपलब्ध होणार असल्याने पर्यटकांना मोठा लाभ होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करुन म्हटले आहे.

महाराष्ट्रासाठी 15,940 कोटी रुपये

संसदेत नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्प 2024-25 मध्ये रेल्वेच्या प्रकल्पांसाठी महाराष्ट्राच्या झोळीत 15,940 कोटी रुपये टाकण्यात आले आहेत.गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत या रकमेत 13 ते 15 पट वाढ झाली असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात नवीन रेल्वे मार्ग दुपरीकरण, तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांसाठी 81 हजार कोटीची गुंतवणूक केली जात आहे. या शिवाय स्थानकांचा पुनर्विकास, फ्रेट कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, हायस्पीड रेक, गतिशक्ती, टर्मिनल सारख्या प्रकल्पांचा विचार करता हा आकडा 1 लाख 30 हजार कोटी रुपयांच्या घरात जातो. महाराष्ट्रात दरवर्षी 180 किमीचा नवा रेल्वे मार्ग तयार केला जात आहे.युपीए सरकारच्या काळात हा आकडा केवळ 50 ते 60 किमी असा होता. यंदा सर्वसामान्य प्रवाशांसाठी 2500 जनरल कोच तयार केले जाणार आहेत. येत्या दोन वर्षात ही संख्या 10 हजार होणार आहे.

नवीन जालना ते जळगाव रेल्वे मार्गिका असा असणार प्रकल्प
जालना ते जळगाव रेल्वे मार्ग 174 किमी
प्रकल्पाची किंमत ₹7,106 कोटी रुपये
केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा 50 - 50 टक्के
रोजगार निर्मिती60 लाख मनुष्य दिवस
जमिनीची गरज 935 हेक्टर
कार्बन उत्सर्जन घटणार 54 कोटी किलो ( 2.2 कोटी वृक्षांच्या तोडीचे )

जालना ते जळगाव नवीन रेल्वे मार्गिका एक दृष्टीक्षेप –

नवीन जालना ते जळगाव 174 किमीच्या रेल्वे मार्गिकेमुळे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट अंजठा लेण्यांसाठी कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. मराठवाडा ते उत्तर महाराष्ट्रात जाण्यासाठी सर्वात जलद मार्ग उपलब्ध होणार आहे.

प्रकल्पाची किंमत – ₹7,106 कोटी रुपये

राज्य सरकारचा वाटा – 50 टक्के

रोजगार निर्मिती – 60 लाख मनुष्य दिवस

जमिनीची गरज – 935 हेक्टर

कार्बन उत्सर्जन घटणार – 54 कोटी किलो ( 2.2 कोटी वृक्षांच्या तोडीचे )

रेल्वे बजेटमध्ये केंद्राने खालील आठ नव्या रेल्वे मार्गिकांना मंजूरी दिली आहे …

अनुक्रमांकनवीन रेल्वे मार्गिका एकूण लांबी ( कि.मी. )या जिल्ह्यातून जाणार राज्य
1गुनुपूर - थेरुबली नवा मार्ग73.62 रायागाडा ओदिशा
2जुनागढ - नबरंगपूर रेल्वे मार्ग116.21 कलाहांडी आणि नबरंगपूरओदिशा
3बदामपहाड - कंदुझारगड मार्ग82.06केओंझार आणि मयूरभंजओदिशा
4बांगिरिपोसी - गोरुमहिसानी85.60मयूरभंजओदिशा
5 मलकानगिरी - पांडुरंगपुरम ( व्हाया भद्राचलम ) 173.61मलकानगिरी, पूर्व गोदावरी आणि भद्राद्री कोठागुडेम ओदिशा, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा
6बुरामरा - चाकूलिया 59.96पूर्व सिंगभूम, झारग्राम आणि मयूरभंज झारखंड, प.बंगाल आणि ओदिशा
7जालना - जळगाव 174छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र
8बिक्रमशीला 26.23भागलपूर बिहार

64 नवीन रेल्वे स्थानके बांधणार

केंद्रिय मंत्रिमंडळाच्या अर्थ व्यवहार समितीने आठ नव्या रेल्वे मार्गिकांना मंजूरी दिलेली आहे. या मार्गिकांसाठी एकूण 24,657 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. या आठ मार्गिका साल 2030-31 पर्यंत पूर्ण होणार आहेत. हे आठ प्रकल्प सात राज्यातील 14 जिल्ह्यांना जोडणार आहेत. उदा. ओदिशा, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल. या नव्या आठ रेल्वे मार्गिकांमुळे सध्याचे रेल्वेचे नेटवर्क 900 किमीने वाढणार आहे. या प्रकल्पात तब्बल 64 नवीन स्थानके बांधण्यात येणार आहेत. सहा जिल्ह्यातील 510 गावांना आणि 40 लाख लोकसंख्येला त्याचा फायदा होणार आहे.

दोन लोकलमधील गॅप 150-180 सेंकदाने कमी होणार

पश्चिम रेल्वेवर दररोज 1394 लोकल ट्रेन चालविल्या जातात तर मध्य रेल्वेवर दररोज 1810 लोकल ट्रेन धावतात. मध्य रेल्वेवर दररोज 40 लाख प्रवासी तर पश्चिम रेल्वेवर दररोज 35 लाख प्रवासी प्रवास करीत असतात. दोन लोकल ट्रेनमधील वेळ कमी करण्यावर काम सुरु असून हा वेळ 150-180 सेंकदाने कमी करण्याची योजना असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच म्हटले आहे. त्यामुळे मुंबईत 250 लोकल ट्रेन आणखी सुरु करता येतील असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.

100 मेल- एक्सप्रेस जादा सोडता येणार

मध्य रेल्वेच्या कुर्ला येथील टिळकनगर टर्मिनसवर सध्या पाच प्लॅटफॉर्म आहेत. आम्ही तेथे आणखी चार प्लॅटफॉर्म बांधणार आहोत. तसेच परळ कारखान्यात सहा प्लॅटफॉर्मचे लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी नवीन परळ टर्मिनल उभारण्याची योजना आहे.पुणे येथे शिवाजीनगर, खडकी, हडपसर आणि उरुली येथे नवीन टर्मिनस उभारण्याची योजना असल्याचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.नवीन परळ टर्मिनस आणि टिळकनगर टर्मिनस येथील फलाटांची संख्या वाढविण्याच्या योजनांमुळे मुंबईतून 100 मेल- एक्सप्रेस सोडता येतील अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

कवच सुरक्षा प्रणाली टप्प्या टप्प्याने लागू होणार

रेल्वेचे वारंवार अपघात होत आहेत. रेल्वे ट्रेनची टक्कर टळण्यासाठी साल 2016 मध्ये कवच सुरक्षा सिस्टीमची पहिली आवृत्ती तयार झाली होती. साल 2019 ला याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले. आणि त्याचे पेटंट देखील मिळाले आहे. युरोपाच्या तुलनेच भारतीय टक्कर सुरक्षा प्रणाली कवच अधिक अत्याधुनिक आहे. कवच यंत्रणेच्या नव्या व्हर्जनला गेल्याच आठवड्यात आरडीएसओने मंजूरी दिलेली आहे. टप्प्या टप्प्याने सर्व रेल्वे मार्गावर ही कवच प्रणाली लागू होणार असल्याची माहिती देखील रेल्वे मंत्र्‍यांनी दिली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.