सासू-सूना कागदपत्री वेगळ्या व्हा…; लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना नेत्याचा अजब सल्ला

Arjun Khotkar on Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजेनेची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेवर बोलताना शिवसेना नेत्याने महिलांना अजब सल्ला दिलाय. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठीचा सल्ला जाहीर सभेत दिलाय. वाचा...

सासू-सूना कागदपत्री वेगळ्या व्हा...; लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना नेत्याचा अजब सल्ला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 2:48 PM

राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला तहसील कार्यलयात गर्दी करत आहेत. यातून महिलांना आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या शिवाय वर्षा तब्बल 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजनाही जाहीर करण्यात आली आहे. मात्र या योजनांचा लाभ घेण्यासाठी माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी महिलांना अजब सल्ला दिला आहे. लाडकी बहीण आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या गॅस सिलेंडर योजनेचे लाभ घेण्यासाठी सासू सुनांनी कागदपत्री वेगवेगळं राहण्याचा अजब सल्ला अर्जुन खोतकर यांनी महिलांना दिलाय.

अर्जुन खोतकर यांचा सल्ला काय?

तुम्ही सर्वजणी मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहात. म्हणून घरच्यांना फा@#X मारू नका, अर्जुन खोतकर म्हणालेत.  एका परिवारासाठी मुख्यमंत्र्यांनी 3 सिलेंडर जाहीर केलेत, मात्र तुम्ही थोडी चालाखी करा. सासू- सूना वेगवेगळ्या रहा फक्त कागदपत्री म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर वाढवून मिळतील, असा सल्ला अर्जुन खोतकर यांनी दिला आहे.

जालन्यामध्ये गायरान हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यां उपस्थित होते. या परिषदेला मोठ्या प्रमाणावर महिलांची उपस्थिती होती. यावेळी केलेल्या भाषणात अर्जुन खोतकर यांनी उपस्थित महिलांना उद्देशून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून हा सल्ला दिलाय.

लाडकी बहीण योजना काय आहे?

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काही योजनांची घोषणा करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे. असे लाभार्थी महिलेला दरवर्षी सुमारे 46 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत.

घरगुती गॅसबाबत सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. लाभार्थी महिलांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. 56 लाख 16 हजार महिलांसाठी वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याबाबतच्या योजनेची घोषणा केली आहे. बीपीएल रेशनकार्ड अर्थात पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्यातील तब्बल 56 लाख 16 हजार महिलांना याचा थेट फायदा होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.