Chagan Bhujbal : आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही; वडी गोद्रीतून छगन भुजबळ कडाडले

Chagan Bhujbal On Reservation : ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चिघळला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलन सुरु आहे. त्यात छगन भुजबळांनी अनेक मुद्यांवर चौफेर फटकेबाजी केली.

Chagan Bhujbal : आरक्षण म्हणजे गरीबी हटावचा कार्यक्रम नाही; वडी गोद्रीतून छगन भुजबळ कडाडले
Chagan Bhujbal on OBC Reservation
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 3:40 PM

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. तर ओबीसीच्या ताटात कुणाला वाटेकरी नको, म्हणून ओबीसी आंदोलन सुरु आहे. अर्थात या ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व आपसुकच छगन भुजबळ यांच्याकडे येते. भुजबळ हे सरकारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहे. त्यांनी वडी गोद्रीत मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील, आरक्षणाचा गरज या सर्वांवर जोरदार फटकेबाजी केली. आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नसल्याचे ते म्हणाले.

आम्ही तर पाठिंबा दिला

आम्ही काही मागत नाही. आम्ही म्हणतो, आमचं आरक्षण आमच्या ताटातील तसंच राहू द्या. त्यांना दुसरं ताट द्या. आम्ही त्यांना पाठिंबा देतो. आम्ही पाठिंबा दिला. त्यांना वेगळं आरक्षण दिलं. तीन वेळा कायदा आला. आम्ही तीनवेळा पाठिंबा दिला, असे छगन भुजबळ म्हणाले. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचे अनेकदा म्हटले आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्याची बाजू त्यांनी मांडली आहे.

हे सुद्धा वाचा

आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाही

आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आदिवासी, दलित समाजातील लोक कलेक्टर झाले, पोलीस कमिशनर झाले. पण आजही झोपडपट्ट्यात दलित आदिवासी राहतात. गरीबी हटली नाही. जे गरीब आहे. पिचलेले आहे. मुख्यप्रवाहाच्या बाहेर आहे, गावागावात अन्याय सहन करत आहेत. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी समान अधिकार देण्यासाठी आरक्षण दिलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी संविधानातून आरक्षण दिलं. महात्मा फुलेंनी तीनशे वर्षापूर्वी सांगितलं सर्व समान आहेत. जे गरीब आहेत. त्यांना वर आणलं पाहिजे. शाहू महाराजांनीही आरक्षण दिलं, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

लोकशाहीत लोकशक्ती महत्वाची

लढाई संपलेली नाही. निवडणुकीच्या आधी सुद्धा, निवडणुकीनंतरही गावागावत हल्ले करण्यात आले. मारपीठ करण्यात आली. पोलिसांनी डोळेझाक केली. हे सर्व पाहून वेदना झाल्या. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली जेव्हा लोकशक्ती एकत्र येते तेव्हा त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये धनशक्ती किंवा इतर कोणतीही शक्ती नाही तर लोकशक्ती अत्यंत मोठी असल्याचे ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.