जालन्यातील चांदई एक्कोमध्ये तुंबळ हाणामारी; जालन्यातील राड्यामागे नेमकं कारण, नेमका वाद काय?

जालना-चांदई गावामध्ये दोन महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा अश्वरुढ पुतळा बसविण्यात आला होता. त्या दरम्यान त्या खालील कमानीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे अशी गावातील दुसऱ्या गटाची मागणी होती, मात्र रात्री अज्ञाताने गोपीनाथ मुंडे यांचे नाव असलेले बॅनर काढण्यात आले. त्यामुळे सकाळी दोन गटाने त्या बॅनरसाठी मोर्चा काढला.

जालन्यातील चांदई एक्कोमध्ये तुंबळ हाणामारी; जालन्यातील राड्यामागे नेमकं कारण, नेमका वाद काय?
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 5:35 PM

जालनाः भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को (Chandoi Ekko Jalna) या गावात दोन गटात तुंबळ हाणामारी (Violent fighting between the two groups) झाली आहे. यावेळी दोन गट आमनेसामने आल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची परिस्थिती होती. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याने परिस्थित अटोक्यात आली. चांदई एक्को या गावामध्ये ज्यावेळी गावातील वेशीवरुन दोन गटात मतभेद निर्माण झाले त्यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक (Stone throwing) करण्यात आली. यामध्ये परिसरातील काही दुकानांची आणि वाहनांचे नुकसान झाले आहे.

बॅनर दंगलीचे कारण

जालना-चांदई गावामध्ये दोन महिन्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा अश्वरुढ पुतळा बसविण्यात आला होता. त्या दरम्यान त्या खालील कमानीला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे अशी गावातील दुसऱ्या गटाची मागणी होती, मात्र रात्री अज्ञाताने गोपीनाथ मुंडे यांचे नाव असलेले बॅनर काढण्यात आले. त्यामुळे सकाळी दोन गटाने त्या बॅनरसाठी मोर्चा काढला.

परिस्थिती तणाव पूर्ण

ज्यावेळी हा मोर्चा काढण्यात आला त्याचवेळी ही परिस्थिती तणाव पूर्ण बनली होती. त्यामुळे हा वाद होऊन दगडफेक झाली, ही दगडफेक झाल्यानंतर परिसरातील दुकाने आणि वाहनांचेही नुकसान झाले.

जमावाला रोखण्यासाठी हवेत गोळीबार

वाद विकोपाला गेल्यामुळे यावेळी पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी हवेत गोळीबार केला. पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून,तर एका पोलीस व्हॅनची तोडफोड करण्यात आली आहे.

वेशीवरील कमानीवरुन वाद

गावाच्या वेशीवरील कमानीवरुन जो हा संपूर्ण वाद झाला आहे, त्यामुळे चांदई एक्को गावातील सामाजिक वातावरण बिघडले आहे. वाद वाढल्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी सुरु झाली. यावेळी दगडफेक केली गेल्याने वाद विकोपाला गेला. दोन्ही गट एकमेकांसमोर उभे राहिले गेली त्यामुळे वाद विकोपाला जाण्याची शक्यता होती. दोन्ही गटावर  त्याच वेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता होती त्यामुळे पोलिसांकडून यावेळी हवेत दोन वेळा गोळीबार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते. सध्या चांदई एक्को या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.