औकातीत राहा बेट्या हो, आम्ही शांत बसलो म्हणजे… छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंना मोठा इशारा

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंना मोठा इशारा दिला आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलं आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी संबोधित केलं. ओबीसी प्रश्नांवर ते बोलते झाले. वाचा सविस्तर...

औकातीत राहा बेट्या हो, आम्ही शांत बसलो म्हणजे... छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंना मोठा इशारा
छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 3:51 PM

औकीतत राहा बेट्या हो… आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहोत. आम्ही जनावरं नाही. कुठेही न्यावं. ते माकडं म्हणतंय भुजबळांना जमानतीवर सोडलं. अरे काय बोलतो त्याला कळत नाही. काय बोलावं कुठं बोलावं कळत नाही. मी त्याला बोलण्याऐवजी हाकेंसोबत त्याने चर्चा करावी मग आमच्याकडे यावं, असं छगन भुजबळ म्हणाले. जालना जिल्ह्यातील वडी गोद्री या ठिकाणी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषण करत आहेत. या ठिकाणी सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे. या ठिकाणी बोलताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे.

कुछ लोग अपनी औकात भूल गये, अपनी याद उन्हे दिलानी होगी… खरे दाखले असतील तर हरकत नाही. पण खोटे असेल तर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते दाखले तपासले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अनेक दाखल्यांवर खाडाखोड झालीय, असं छगन भुजबळ म्हणाले.

काही लोक ओबीसीत जातात फायदा घेतात. नंतर आर्थिक मागास दाखवतात आणि त्याचं प्रमाणपत्र दाखवून लाभ घेतात. नंतर एसीबीसीचंही आरक्षण घेत आहे. एकच माणूस तीन तीन ठिकाणी आरक्षण मागत आहे. त्याला आधार कार्डची जोड द्या. म्हणजे एका व्यक्तीला एकाच कॅटेगिरीतून आरक्षण मिळेल. ही काही खिरापत नाही. या पंगतीतून उठ, त्या पंगतीत जा. त्या पंगतीतून या पंगतीत या असं चालणार नाही. हे खपवून घेणार नाही, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय.

ओबीसी मंचावर छगन भुजबळांची शेरोशायरी

जंग लगी तलवार को अब धार लगानी होगी कुछ लोग अपनी औकात भूल गये, अपनी याद उन्हे दिलानी होगी

आता घाबरायचं नाही- भुजबळ

आम्ही सर्व पक्षाच्या लोकांना अधिवेशन काळात एकत्र बोलावणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. हाके आणि नवनाथ वाघमारे यांना बोलावणार आणि सर्वांच्या समोर आम्ही पुरावे मांडणार. काही राजकारणी फार हुशार आहेत. ते इकडे डमरू वाजवतील. तिकडेही वाजवतील. आमच्या एका सहकाऱ्याने सांगितलं सगेसोयरे कोर्टात टिकणारच नाही. गिरीश महाजन यांनी सांगितलं. ओबीसींच्या लढ्यात असे आपले सहकारी हात बळकट करण्यासाठी सज्ज झाले आहे. आता घाबरायचं नाही. मागे राहायचं नाही, असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.