लढाई अजून संपलेली नाही, निवडणुकीच्या आधी सुद्धा…; ओबीसींच्या मंचावरून छगन भुजबळांचा एल्गार

Chhagan Bhujbal on OBC Aarakshan : ओबीसींच्या मंचावरून छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी जातजनगणनेची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यावेळी काय म्हणाले? वाचा सविस्तर.....

लढाई अजून संपलेली नाही, निवडणुकीच्या आधी सुद्धा...; ओबीसींच्या मंचावरून छगन भुजबळांचा एल्गार
छगन भुजबळImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 22, 2024 | 3:29 PM

मराठा समाजाला आरक्षण द्या. मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, अशी भूमिका ओबीसी समाजाची आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे जालना जिल्ह्यातील वडी गोद्री या ठिकाणी उपोषण करत आहेत. या ठिकाणी सरकारकारच्या शिष्टमंडळ पोहोचलं आहे. यावेळी छगम भुजबळ यांनी उपस्थितांना संबोधित केलं. लढाई संपलेली नाही. निवडणुकीच्या आधी सुद्धा, निवडणुकीनंतरही गावागावत हल्ले करण्यात आले. मारपीठ करण्यात आली. पोलिसांनी डोळेझाक केली. हे सर्व पाहून वेदना झाल्या. एक लक्षात ठेवा, कोणी किती मोठी शक्ती असली जेव्हा लोकशक्ती एकत्र येते तेव्हा त्या शक्तीचा पराभव झाल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये धनशक्ती किंवा इतर कोणतीही शक्ती नाही तर लोकशक्ती अत्यं मोठी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.

जातजनगणनेची मागणी

शेळ्या मेंढ्या मोजता तर माणसांची मोजदाद का करत नाही. आमची जात गणना केली पाहिजे. काही मागितलं तर कोर्टात जातात. कोर्ट विचारतं तुम्ही किती टक्के आहात. आम्ही आकडा कसा सांगायचा. ब्रिटिशांनी गणना केली तेव्हा ५४ टक्के होतो. मग आम्ही १०-१२ टक्के आहोत असं कसं म्हणता. करा जातगणना. नितीश कुमारांनी जातजनगणना केली. आम्ही ६५ टक्क्यावर गेलो. आम्ही जातीयवाद केला नाही. त्यांनी जातीयवाद केला, असं म्हणत छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे.

महात्मा फुल्यांनी जे सांगितलं ते शाहू महाराजांनी सांगितलं. ते बाबासाहेबां संविधानात आणलं आणि आम्हाला न्याय दिला. आमची सर्व लेकरंबाळं काही गाड्यातून फिरत नाही. ते ही अन्नाला मोताद आहे. त्यांची काय परिस्थिती आहे. त्यासाठी हे आरक्षण आहे. त्यात इतर वाटेकरी झाले तर आमचे काय होणार, असं म्हणत छगन भुजबळ यांनी ओबीसींची परिस्थिती विशद केली.

छगन भुजबळांचं आवाहन काय?

तुम्ही सर्व एकत्र राहिलं तर आरक्षण टिकेल. तुम्ही कोणत्या पक्षात आहात याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. मजबुतीने उभं राहा. ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी होऊ देऊ नका. केवळ मतांसाठी हे करणार आहात का. मतांसाठी घाबरू नका. तुम्ही ५४ टक्के एक राहिला तर मुस्लिम, दलित आणि आदिवासी तुमच्यासोबत राहतील. तुम्ही आपआपसात लढत राहिला तर काहीही होणार नाही. एकत्रित या. तू मोठा मी मोठा हा भेदभाव नाही. आपण सर्व सारखे असं समजून कामाला लागा, असं आवाहन छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाला केलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.