जे चांगलं बोलतात त्यांच्या गुन्हा, अब्दुल सत्तारसारखे लोक मात्र तसेच सुटतात, काँग्रेस नेत्याने आव्हाडप्रकरणी दिली प्रतिक्रिया…
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, जे चांगले बोलतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो मात्र अब्दुल सत्तारसारखे लोक मोकळे सुटतात.
जालनाः काँग्रेसच्यावतीने आज जालन्यात राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जालना शहरातून उद्या 1 हजार कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी वाशीमला जाणार आहेत.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे चांगले बोलतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो मात्र अब्दुल सत्तारसारखे लोक सुटतात.
साध्या सरळ माणसांना अटक करत आहेत आणि हे लोकशाहीला धरून नाही असे गोरंट्याल यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर ज्या महिलेने तक्रार केली आहे. त्याविरोधात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने उभा राहिल्या आहेत.
याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीनेही महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्याच्या राजकारणाची पातळी खालवली असल्याचेही अनेक नेत्यांनी मत व्यक्त केले आहे.
तर भाजपकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात यावा असंही म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकारांना उत्तर देताना या प्रकरणाविषयी जितेंद्र आव्हाडांबरोबर बोलून त्यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू असल्याने काँग्रेसह, राष्ट्रवादी आणि समविचारी पक्षानी सहभाग नोंदवत राहुल गांधींचे समर्थन केले आहे.