परदेशातून आलेल्यांना 7 दिवस क्वारंटाइन, पुन्हा टेस्ट करणे बंधनकारक, सध्या तरी स्थिती नियंत्रणात- आरोग्यमंत्री राजेश टोपे

भारतात अजूनही ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे अहवाल आलेले नाहीत. त्यामुळे परिस्थिती सध्यातरी नियंत्रणात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. मात्र विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस क्वारंटाइन आणि 7 दिवसानंतर कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे.

परदेशातून आलेल्यांना 7 दिवस क्वारंटाइन,  पुन्हा टेस्ट करणे बंधनकारक, सध्या तरी स्थिती नियंत्रणात- आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 12:35 PM

जालनाः जगातील 19 देशांमध्ये ओमिक्रॉन(Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा (Corona Varient) शिरकाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात आणि महाराष्ट्रात खबरदारी घेतली जात आहे. सध्या तरी भारतातली स्थिती अत्यंत धोकादायक अशी नाही. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होण्याची गरज नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात दिली. टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी आज त्यांनी सविस्तर संवाद साधला.

महाराष्ट्रात खबरदारीचे कोणते उपाय?

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे जग चिंतेत असताना महाराष्ट्रात काय खबरदारी घेतली जात आहे, याविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. – – कस्तुरबा रुग्णालयात टेस्ट लॅब आहेत. तेथे जेनेटिक सिक्वेन्सिंगचे नमूने तपासायला दिले आहेत. कस्तुरबासारखे लॅब अजून बनवण्याचे काम सुरु आहे. – परदेशातून आलेल्या व्यक्तींना 7 दिवस क्वारंटाइन करावे लागेल. – 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – सध्या तरी एवढी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही, असे WHO ने सांगितले असले तरीही ओमिक्रॉनचा अहवाल आल्यानंतरच यासंबंधी निर्णय घ्यावा लागेल.

मुलांच्या लसीकरणाबद्दल काय म्हणाले आरोग्यमंत्री?

राज्यातील लहान मुलांसाठी लसीकरण कधी होणार आणि कोरोना लसीच्या बुस्टर डोसविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, या दोन्ही विषयांसाठी मी स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेतली. मात्र यावर आयसीएमआरनं दिलेल्या सूचनांनंतरच निर्णय घेता येईल, असे त्यांनी सांगितले.

शाळा सुरु करणे किती योग्य?

सध्याच्या परिस्थितीत राज्यातील शाळा सुरु होणे किती योग्य आहे, याविषयी विचारले असता राजेश टोपे म्हणाले, हा प्रश्न स्थानिक पातळीवरील प्रशासनावर अवलंबून आहे. सध्या तरी ओमिक्रॉनचा कोणताही धोका नाही. विविध तज्ज्ञांनीही मुलांनी आता शाळेत येणे गरजेचे असल्याचे मत नोंदवले आहे. त्यामुळेच आपण शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांनी मुलांची काळजी करणे स्वाभाविक आहे. पण त्यांना खबरदारीचे उपाय, नियम पाळायला लावणे हे त्यांनीच पुढाकार घेऊन शिकवले पाहिजे, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

इतर बातम्या-

भाजपच्या ‘सरकारी’ दहशतवाद्यांशी आम्ही पुरलो आहोत, ममता बॅनर्जी आणि संजय राऊत भेटीत एकीवर चर्चा!

भाजपच्या ‘सरकारी’ दहशतवाद्यांशी आम्ही पुरलो आहोत, ममता बॅनर्जी आणि संजय राऊत भेटीत एकीवर चर्चा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.