Vaccination: आता 12 वर्षांमधील मुलांसाठीही लसीकरण व्हावे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज राज्यभरात सुरुवात झाली. आता पुढील टप्प्यात 12 वर्षांपुढील मुलांनाही लस देण्याची मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Vaccination: आता 12 वर्षांमधील मुलांसाठीही लसीकरण व्हावे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jan 03, 2022 | 11:23 AM

जालनाः 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज राज्यभरात सुरुवात झाली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालना येथून या मोहिमेला प्रारंभ केला. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये या वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरु झाले असून पालक, मुले, शाळा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला प्रोत्साहन द्यावे तसेच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. जालना येथील महिला व बाल रुग्णालयात राजेश टोपे यांनी किशोरवयीनांच्या लसीकरणाला (Children Covid Vaccination) प्रारंभ केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आता पुढील टप्प्यात 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणाचीही मागणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्राकडे आता 12 वर्षांपुढील लसीकरणासाठी मागणी

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, 15 ते 18 वर्षांचा वयोगट हा खूप फिरणारा ग्रुप असतो. या ग्रुपमध्ये लसीकरणाची गरज होती. काल केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांच्यासोबत बैठक झाली. त्यात सर्व मुद्दे मांडले. तसेच 12 वर्षांपुढील मुलांनाही लस देण्याची मागणी केली आहे. तसेच इमर्जन्सी सर्व्हिसमधील कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी कोविशील्ड 40 लाख आणि कोव्हॅक्सिनचे 50 लाख डोसची गरज आहे. या लसींचा राज्यांना पुरवठा केला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आल्याचं, राजेश टोपे यांनी सांगितलं.

…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन!

राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता, राज्यात लॉकडाऊन लागणार का हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. यावर राजेश टोपे म्हणाले, प्रत्येक राज्यात लॉकडाऊनची परिभाषा वेगवेगळी करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात बेड ऑक्युपन्सी म्हणजे किती बेड उपलब्ध आहेत, किती ऑक्युपाय झाले आहेत, समजा 40 टक्क्यांपर्यंत बेड ऑक्युपाय झाले आणि ऑक्सिजन कन्झप्शन दररो 700 मेट्रिक टन वाढलं तर लॉकडाऊन करावं, असा निकष आम्ही लावला आहे.

इतर बातम्या-

Postpartum Care | बाळंतपणानंतरही पुन्हा सडपातळ व्हा, वजन नियंत्रणासाठी घरगुती उपाय

15 ते 18 वयोगटातील मुलेच भरपूर फिरणारी, लसीकरणाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं आवाहन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.