जालनाः 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज राज्यभरात सुरुवात झाली. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालना येथून या मोहिमेला प्रारंभ केला. महाराष्ट्रातील सर्वच शहरांमध्ये या वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरु झाले असून पालक, मुले, शाळा तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी या मोहिमेला प्रोत्साहन द्यावे तसेच लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. जालना येथील महिला व बाल रुग्णालयात राजेश टोपे यांनी किशोरवयीनांच्या लसीकरणाला (Children Covid Vaccination) प्रारंभ केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. आता पुढील टप्प्यात 12 वर्षांच्या पुढील मुलांच्या लसीकरणाचीही मागणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, 15 ते 18 वर्षांचा वयोगट हा खूप फिरणारा ग्रुप असतो. या ग्रुपमध्ये लसीकरणाची गरज होती. काल केंद्रीय आरोग्यमंत्री मांडवीय यांच्यासोबत बैठक झाली. त्यात सर्व मुद्दे मांडले. तसेच 12 वर्षांपुढील मुलांनाही लस देण्याची मागणी केली आहे. तसेच इमर्जन्सी सर्व्हिसमधील कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी कोविशील्ड 40 लाख आणि कोव्हॅक्सिनचे 50 लाख डोसची गरज आहे. या लसींचा राज्यांना पुरवठा केला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आल्याचं, राजेश टोपे यांनी सांगितलं.
राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता, राज्यात लॉकडाऊन लागणार का हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. यावर राजेश टोपे म्हणाले, प्रत्येक राज्यात लॉकडाऊनची परिभाषा वेगवेगळी करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात बेड ऑक्युपन्सी म्हणजे किती बेड उपलब्ध आहेत, किती ऑक्युपाय झाले आहेत, समजा 40 टक्क्यांपर्यंत बेड ऑक्युपाय झाले आणि ऑक्सिजन कन्झप्शन दररो 700 मेट्रिक टन वाढलं तर लॉकडाऊन करावं, असा निकष आम्ही लावला आहे.
इतर बातम्या-