Manoj Jarange Patil : तुम्ही कधी पण निवडणुका घ्या, तुम्ही फसलातच.. मनोज जरांगे पाटील कुणाची उपटणार खूटी? असा दिला थेट इशारा

Manoj Jarange Patil : राज्यात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीने पण जागा वाटपाचा फॉर्म्युलचे गणित जुळवायला सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यातच मराठा आरक्षणाची धग कोणाला बसणार याकडे पण सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Manoj Jarange Patil : तुम्ही कधी पण निवडणुका घ्या, तुम्ही फसलातच.. मनोज जरांगे पाटील कुणाची उपटणार खूटी? असा दिला थेट इशारा
मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
Follow us
| Updated on: Sep 12, 2024 | 2:00 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीची गोळाबेरीज सुरू झाली आहे. गुणाकारासोबत कुठे भागाकार करता येईल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभेत अनेकांचा हिशोब चुकता करण्यात येईल, असा इशारा दिल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे. राज्यात महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीने पण जागा वाटपाचा फॉर्म्युलचे गणित जुळवायला सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यातच मराठा आरक्षणाची धग कोणाला बसणार याकडे पण सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बिचाऱ्या गणपतीची शपथ कशाला घेता?

बिचाऱ्या गणपतीची शपथ कशाला घेता, आता तुम्हाला तेवढा देव राहिला का? दैवताच्या शपथा कशाला वाहता तुम्ही, महाविकास आघाडीला कशाला प्रश्न विचारू? तुम्ही तुमच्या नेत्याला प्रश्न विचारा, असा पलटवार मनोज जरांगे यांनी भाजपच्या नेत्यांवर केला. विधानसभा अध्यक्ष कडे मागणी केली ना, अरे सत्तेकडेच मागाव लागेल. तुम्ही अधिवेशन कोणाला मागितलं सरकारलाच मग आम्ही आरक्षण कोणाला मागणार सरकारलाच ना, महाविकास आघाडीच्या माजी विधानसभा अध्यक्षकडे का मागणी केली नाही अधिवेशन बोलवा म्हणून, असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला.

हे सुद्धा वाचा

जरांगे पाटील यांचा महायुतीवर प्रश्नांचा भडीमार

-संगे सोयऱ्याची आधी सूचना काढली अंमलबजावणी का केली नाही ? – सरसकट राज्यातील गुन्हे मागे घेऊ म्हटले होते का घेतले नाही? – मराठा आणि कुणबी एकच आहेत आपण का देत नाहीत.? – ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या का थांबून ठेवल्यात हे विचार तुह्या नेत्याला. – SIT का नेमली हे विचारा त्यांना, लाखोंना केसेस का केल्या ? – बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना नोकऱ्या का दिला नाहीत ? – शिंदे समितीला मुदतवाढ दिली शिंदे समिती का काम करत नाही ? – EWS मराठ्याचं का रद्द केलं हे विचारणं देवेंद्र फडणवीस यांना – अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का झाला नाही ? – कोपर्डी घटनेच्या ताईच्या आरोपीला अजून फाशी का नाही ? – शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यायची ती दिली का हे विचार. – वाहून गेलेल्या जनावराचा पीएम रिपोर्ट द्या म्हणत आहेत त्या जनावराचा पीएम रिपोर्ट असतो का ? – शेकड्यांनं प्रश्न आहेत पडलेला कुठे विचारायला लावतो. – गावातले प्रश्न सरपंचालाच विचारावे लागतील की पडलेल्या सरपंचाला सांगायचे.

तोडगा काढा नाहीतर तुम्ही फसलात

चोराच्या उलट्या बोंबा असा झाल आहे देवेंद्र फडणवीस यांचं, हे देवेंद्र फडणवीस बोलत आहेत आमदार बोलत नाहीत. लोक म्हणतात फडणवीस लय हुशार आहेत, तेवढ्यातच हुशार आहे का ते याला फोडा त्याला फोडा, त्याच्यावर केस कर, असा टोला जरांगे पाटील यांनी लगावला. तुम्ही उद्या निवडणुका घेतल्या तरी फसला, चार महिन्याने निवडणुका घेतल्या तरी फसलात, फडणवीस साहेब तुम्हाला तोडगाच काढावा लागणार आहे. तुम्ही किती सरकारी आंदोलन उभे केले, त्या राज्यात आता पंधरा दिवस हे आंदोलन उभे राहणार आहे, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.