Manoj Jaranage Patil | मनोज जरांगे पाटील अजूनही आंदोलनस्थळी, आंतरवाली सराटीमध्ये काय घडतय? VIDEO

Manoj Jaranage Patil | सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केलाय.

Manoj Jaranage Patil | मनोज जरांगे पाटील अजूनही आंदोलनस्थळी, आंतरवाली सराटीमध्ये काय घडतय? VIDEO
manoj jarange
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 11:48 AM

जालना : मागच्या 17 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण अखेर काल मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: काल आंतरवाली सराटी गावामध्ये गेले होते. त्यांच्याहातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडंलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. जीआर काढला, तर तो कोर्टात टिकणार नाही असं सरकारच म्हणण होतं. आम्हाला टिकणार आरक्षण द्यायच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं, तरी अजूनही ते आंदोलन स्थळी बसले आहेत. तिथे त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. उपोषण मागे घेतलं असलं, तरी आंदोलन सुरुच राहणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केलाय. त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडल असलं, तरी त्यांचं साखळी उपोषण सुरु राहणार आहे. “सरकारने जी मुदत मागितली होती, जाहीरपणे महाराष्ट्रासमोर सरकारने एक महिन्याची मुदत मागितली. ती मुदत मराठा समाजाने दिली आहे. एक महिना आरक्षणाबाबत काही बोलणार नाही. आरक्षण देण्यासाठी त्यांनी कशी तयारी करावी? काय करावी? कसं आक्षण द्यायचं? पुरावे कसे आणायचे? ते सरकार ठरवेल. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपण द्यायची जबाबदारी सरकारची आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. ‘आरक्षणाशिवाय स्वस्थ बसणार नाही’

आमरण उपोषणाचा आता साखळी उपोषणात रुपांतर केल्याच त्यांनी सांगितलं. “मुख्यमंत्री मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मनोज जरांगे पाटील तुम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसाल, तर मी सुद्धा आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.