‘कितीही रॅली काढा, तुम्हाला रपारप पाडणार’, मनोज जरांगे यांनी फडणवीसांना पुन्हा घेतलं अंगावर

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मनोज जरांगे यांनी यावेळी आम्हाला आरक्षण द्या नाहीतर विधानसभेला नाव सांगून उमेदवार पाडू असं चॅलेंज सरकारला दिलं आहे.

'कितीही रॅली काढा, तुम्हाला रपारप पाडणार', मनोज जरांगे यांनी फडणवीसांना पुन्हा घेतलं अंगावर
मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 7:30 PM

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील चर्चेत आले आहेत. मनोज जरांगे आरक्षणासाठी आजपासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.  यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी भाजप विधानसभा निवडणुकीआधी काढणाऱ्या रॅलीचा धागा पकडत थेट फडणवीसांवर निशाणा साधला आहे. आम्हाला आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला मजाच बघा, तुम्ही कितीही रॅली काढा, तुम्हाला रपारप पाडणार, असं म्हणत जरागेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा अंगावर घेतलं आहे.

मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?

फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात राहू नका जे घडलेले आहे ते मान्य करा. मराठ्यांच्या पोरांना आरक्षणाचा फायदा करून द्या आम्हाला आरक्षण द्या, गुन्हे मागे घ्या, मला राजकारणात जायचं नाही, आम्हाला आरक्षण द्या, जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला एकालाही निवडून येऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तुमचे प्रवक्ते काहीही बोलतात त्याचे परिणाम फडणवीस यांना भोगावे लागतात. तुमच्या प्रवक्त्यांना वेसण बांधा, महाविकास आघाडीने आमचे आधी थोबाड फोडलेले आहे, पण तुम्ही आता ताजा अन्याय केलेला आहे. या उपोषणाच्या आत तुम्ही जर मार्ग काढला नाही तर तुमची एकही सीट निघू देणार नाही. झेंडे फडकवा अन्यथा काहीही करा, हे आंदोलन टिकणार आहे, आमचं आरक्षण कुणी घातलं हे आम्हाला चांगलं माहीत आहे, आमच्या मतावर कोण बदलत हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही जर ठरल्याप्रमाणे दिलं नाही, तर तुमहाला भुईसपाट करणार, तुम्ही भोपळ्यातून बाहेर या. सत्यता हाताळा, आमचं आरक्षण आम्हाला द्या राजकारण आमचा मार्ग नाही, आम्हाला 50 टक्क्यांच्या आतील ओबीसीतून आरक्षण द्या, आणखी तुमच्या भ्रमातून बाहेर या, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

तुम्हाला 106 आमदार मराठ्यांनी निवडून दिले. आता जे 10 टक्के तुम्ही आरक्षण दिलेलं आहे.त्यात सगळीकडे काड्या केलेल्या आहेत. महामंडळ गोरगरिबांच्या कामाचे नाही. तुम्ही नवीन उद्योजकांना अटी का घातल्या. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज मिळत नाही, मी फडणवीस यांना विरोध करतो असं नाही, सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, केसेस आमच्यावर केल्या. तुम्ही मराठ्यांवर लाखात गुन्हे दाखल केले, महायुतीने आमचे हे हाल केलेत. महाविकास आघाडीने काही आम्हाला तुपाचे डब्बे दिलेले नसल्याचंही मनोज जरांगे म्हणाले.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.