“कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही”; या आमदाराने अनुभवाचे बोल सांगितले…

टास्क फोर्सची बैठक होत असताना सरकारचे अधिकारी या बैठकीला का उपस्थित नसतात असा सवालही त्यांनी यावेळी उभा केला आहे.

कोरोनाला हलक्यात घेता येणार नाही; या आमदाराने अनुभवाचे बोल सांगितले...
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 4:38 PM

जालना : देशाच्या राजधानीसह आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही सरकारकडे कोरोनाविषयी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सध्या जलदगतीने कोरोनाचे रुग्णसंख्या वाढते आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाबाबत ठोस पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे.

मुंबई, पुणे, जालना, कोल्हापूर, सांगली, सातारा अशा विविध जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुले चिंचा व्यक्त केली जात आहे.

ज्या प्रमाणे कोरोनाचे पेशंट वाढले जात आहेत, त्याच प्रमाणे राज्यातील काही भागात कोरोनामुळे रुग्ण दगवल्याच्याही घटना घडल्या आहेत.

त्यामुळेच माजी आरोग्य मंत्री आमदार राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत सरकारने ठोस पावले उचलली पाहिजे अशी विनंती केली आहे. सध्या कोरोनाचे रुग्णसंख्या वाढत असल्याने आमदार राजेश टोपे यांनी कोरोनाबाबत आरोग्य विभागाने सतर्क राहून ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे.

त्या गोष्टी तयार ठेवायला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. यामुळे राजेशे टोपे म्हणाले की, सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण संख्या जलदगतीन वाढत आहे.

त्यामुळे कोरोनाला हलक्यात घेता येणार नसून,सरकार ने जागरूक होऊन लोकांना जागृत करण्याची गरज असल्याचे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने दक्षता घेण्याची गरज आहे. आरोग्य यंत्रणा आणि सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असून टास्क फोर्सची बैठक होताना सरकारचे अधिकारी उपस्थित नसतात असा आरोप माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.

दरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीचे उपाय करून, मास्क, लस बाबत एक धोरण ठरवण्याची गरज आहे. याशिवाय औषधांच्या उपलब्धतेची सरकारकडून पडताळणी झाली पाहिजे असंही टोपे यांनी सांगितले आहे.

टास्क फोर्सची बैठक होत असताना सरकारचे अधिकारी या बैठकीला का उपस्थित नसतात असा सवालही त्यांनी यावेळी उभा केला आहे. त्यामुळे राजेश टोपे यांनी ज्या प्रमाणे कोरोनाविषयी सरकारला विनंती केली आहे. त्याच प्रमाणे त्यांनी सरकारला एक प्रकारचा इशाराही दिला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.