“संजय राऊत हे मनोरंजनाचे साधन”; पवार कुटुंबीयांचे समर्थन केल्याने राऊतांवर या नेत्याची सडकून टीका

खासदार संजय राऊत यांनी पवार कुटुंबीयांचे समर्थन करताना ते म्हणाले की, भाजपसोबत जाण्यासाठी पवार कुटुंबीयांना टार्गेट केलं जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

संजय राऊत हे मनोरंजनाचे साधन; पवार कुटुंबीयांचे समर्थन केल्याने राऊतांवर या नेत्याची सडकून टीका
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 5:22 PM

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार अजित पवार यांच्याबद्दल अनेक उलटसुलट सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच नागपूरमध्ये महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्या सभेत अजित पवार यांना माध्यमांनी तु्म्ही या सभेत बोलणार का असा सवाल केल्यानंतर त्यांनी नकार दिल्यानंतरही वेगवेगळ्या चर्चा झडू लागल्या आहेत. या अशा चर्चा झाल्यामुळे आता पवार कुटुंबीयांवर भाजप आणि सत्ताधाऱ्यांकडून टीका केली जात आहे. सत्ताधाऱ्यांकडून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली जात असल्याने खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देत पवार कुटुंबीयांची त्यांनी पाठराखण केली होती.

त्यावरून आता उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार व शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी जालना दौऱ्यावर असताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

गजानन कीर्तिकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, संजय राऊत बोलतात खूप मात्र त्यांना आता गांभीर्याने कोण घेतं असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना त्यांनी अगदी पातळी सोडून टीका केली आहे. संजय राऊत नेहमीच टीका करतात. ते नको त्या गोष्टींचे समर्थन करतात. त्यामुळे नागरिकही त्यांना कोण मनावर घेत नाही असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे. खासदार संजय राऊत यांनी पवार कुटुंबीयांचे समर्थन करताना ते म्हणाले की, भाजपसोबत जाण्यासाठी पवार कुटुंबीयांना टार्गेट केलं जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता.

त्यांच्या या समर्थनामुळेच त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यावरून खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

त्यांच्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, संजय राऊत हे मनोरंजनाचे साधन झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत काही बोलतो आणि लोकांचे टीव्हीवर मनोरंजन होते असे खोचक टोलाही कीर्तिकर यांनी त्यांना लगावला आहे.

तर याच वेळी त्यांनी अजित पवार यांनी पाठिंबा देताना ते म्हणाले की, अजित पवार काही आमदारांना घेऊन बाहेर पडत असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. त्याला आम्ही विरोध करायचं काही कारण नाही असंही गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.