“संजय शिरसाठ यांची वादग्रस्त क्लिप माझ्याकडे”; अंधारे यांच्यावर टीका करताच ठाकरे गटाने क्लिपचा विषय बाहेर काढला

आमदार संजय शिरसाठ हा स्वतःच कॅरेक्टरलेस माणूस असून माझ्याकडे त्यांच्या विषयीची एका महिलेची क्लिप आहे. ज्यामध्ये तिने शिरसाठ यांच्यावर आरोप केल्याचा दावाही खैरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

संजय शिरसाठ यांची वादग्रस्त क्लिप माझ्याकडे; अंधारे यांच्यावर टीका करताच ठाकरे गटाने क्लिपचा विषय बाहेर काढला
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 7:23 PM

जालना : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबद्दल आमदार संजय शिरसाठ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून आता शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आला आहे. संजय शिरसाठ यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची तयारीही करण्यात आली असून त्यांना महिला आयोगानेही नोटीस दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडूनही संजय शिरसाठ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय शिरसाठ आणि आमदार सुहास कांदे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आमदार संजय शिरसाठ यांना कॅरेक्टरलेस ठरवून त्यांच्याबद्दलची वादग्रस्त माहितीही आपल्याकडे असल्याचे सांगत खैरे यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

त्यामुळे आता ठाकरे गट आणि संजय शिरसाठ यांच्यातील वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे. सुषमा अंधारे यांच्यावर संजय शिरसाठ यांनी टीका केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे.

आमदार संजय शिरसाठ यांच्यावर चंद्रकांत खैरे यांनी टीका करण्याबरोबरच त्यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपानंतर संजय शिरसाठ आता काय प्रतिक्रिया देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

आमदार संजय शिरसाठ हा स्वतःच कॅरेक्टरलेस माणूस असून माझ्याकडे त्यांच्या विषयीची एका महिलेची क्लिप आहे. ज्यामध्ये तिने शिरसाठ यांच्यावर आरोप केल्याचा दावाही खैरे यांच्याकडून करण्यात आला आहे.

दरम्यानच्यावेळी खैरे यांनी सुहास कांदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महिलांन विषयी अशी टीका करणाऱ्या भाजप आणि संघ परिवाराला हे चांगलं वाटतं का असा सवालही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.