Video : ये लगा सिक्सर…; मनोज जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानात
Jarange Patil Playing Cricket in Antarwali Sarati : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील क्रिकेटच्या मैदानात पाहायला मिळाले. जरांगे पाटील अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले. त्यांनी त्यांनी बॅटिंग केली आणि बॉलिंगही केली. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय
संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवली सराटी, जालना | 24 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील… मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते… आरक्षणासाठी ठाम भूमिका मांडणारे अ्न वेळ प्रसंगी सरकारला झुकवणारे आंदोलक… ही ओळख असणारे मनोज जरांगे पाटील आज मात्र वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळाले. मनोज जरांगे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात दिसले. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. मनोज जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळताना दिसले. बॉलिंग आणि बॅटिंग करताना जरांगे या व्हीडीओमध्ये दिसत आहेत. जरांगे पाटील यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आरक्षणसाठी लढा आंदोलन सुरू असतानाच जरांगे आपली खेळाची आवड जपताना दिसत आहेत.
मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील विविध भागात जाऊन लोकांशी संवाद साधला. यावेळी पांढऱ्या रंगाच्या शर्ट आणि पँटमध्येच जरांगे नेहमी दिसले. पण आज मात्र जरांगेंचा वेगळा लूक पाहायला मिळाला. त्यांनी स्पोर्टचं जॅकेट घातलेलं दिसलं.
जरांगे क्रिकेट खेळतानाचा व्हीडिओ
जरांगे यांची बॅटिंग अन् बॉलिंग
अंतरवली सराटीतील क्रिकेटच्या मैदानात जरांगे अगदी फॉर्ममध्ये दिसले. त्यांनी बॅटिंग केली आणि बॉलिंगही केली. तसंच धावत धावा देखील घेतल्या. जरांगे यांचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय.
आरक्षणावर काय म्हणाले जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या उपोषणाबाबत जरांगे यांनी आज अंतरवलीत टीव्ही 9 मराठीशी बोलताना सविस्तर भाष्य केलं. जवळपास 3 कोटी मराठे मुंबईत येणार आहे. आमचे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्हाला आमचं नुकसान करायचं नाही. तिकडे गेल्यावर आम्ही निवांत झोपले पाहिजे. कारण आमच्या इकडची शेतीचे सर्व कामं झाली असतील, असं जरांगे म्हणाले.
एवढे दिवस आम्ही घरी बसलो म्हणून आमच्या पोराचं वाटोळं होत आहे. नेत्याला आपण मोठं केलं. पण हे नेते येतात. खांद्यावर हात टाकतात आणि आमचाच चहा पिऊन जातात. तुम्ही 3 महिने मागितले तेव्हा दिले. तुम्ही 30 दिवस मागितले आम्ही 40 दिवस दिले. तुम्हाला वाढीव वेळ दिला. आता तुम्हीच सांगा संयम म्हणजे काय…, असा सवाल जरांगेंनी सरकारला विचारला आहे.