‘कुणबी जात प्रमाणपत्र चॅलेंज करता येत नाही’, काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
Maratha reservation : एकदिवसात GR काढण्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी काय सांगितलं?. "पूर्वीपासून आम्ही ओबीसीमध्ये आहोत. फक्त एकओळीचा जीआर काढायचा आहे" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जालना : सध्या सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा जीआर काढावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांच आमरण उपोषण सुरु आहे. आज दुपारी 12.30 वाजता सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी येणार आहे. आरक्षणाचा जीआर काढावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आजपर्यंतची मुदत दिली आहे. अन्यथा संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते पाणी त्याग करणार आहेत. सरकारी शिष्टमंडळासोबत होणाऱ्या चर्चेआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. अर्जुन खोतकर यांनी सरकारच्यावतीने मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. आज शिष्टमंडळ भेटल्यानंतरच कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा झाली? ते समजेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आरक्षण देण्याआधी सरकार अहवाल बनवण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागत आहे. मी त्याच समितीला तीन महिन्याचा अवधी दिला आहे. एक महिन्याचा वेळ घेण्याची गरज नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “पूर्वीपासन मराठ्यांचा शेती व्यवसाय आहे. नुसता एक जीआर काढण्याचा प्रश्न आहे. कुणबी जात प्रमाणपत्र चॅलेज करता येत नाही. पूर्वीपासून आम्ही ओबीसीमध्ये आहोत. फक्त एकओळीचा जीआर काढायचा आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे, हा जीआर करायचा आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “याला आधारही मी सांगितला. 83 क्रमांकावर मराठा-कुणबी एकच आहे, असा आयोगाने अहवाल दिला आहे., त्यामुळे अध्यादेश काढताना अडचण येणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘आज आरक्षण मिळेल अशी संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा’
“1 जून 2004 ला मराठा-कुणबी एकच आहे हा जीआर काढला होता. मराठा समाजाला आरक्षण देताना मूळ व्यवसाय शेती हा निकष लावला होता. आता अडचण येणार नाही. जीआर काढाल ही अपेक्षा, आम्ही आशावादी आहोत. चर्चा केली पाहिजे, चर्चेशिवाय मार्ग निघत नाही” अस मनोज जरांगे पाटील म्हणाले. सरकारी शिष्टमंडळ भेटीला येणार आहे, त्यावर ते म्हणाले की, “आज प्रश्न सुटला पाहिजे. ते काहीही करु शकतात. मोठे निर्णय घेतात. हा छोटा विषय आहे. आज आरक्षण मिळेल अशी संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा आहे”