उपोषणाचा सातवा दिवस, आज तब्येत कशी?; मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं…
Manoj Jarage Patil on on his Helth : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस ढासळते आहे. अशात आज त्यांची तब्येत कशी आहे?; मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत हेल्थ अपडेट दिले आहेत. त्यांनी काय म्हटलंय? पाहा...
संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 31 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील सध्या उपोषण करत आहेत. त्यांच्या या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावते आहे. काल उपस्थितांना संबोधित करण्यासाठी उभे राहत होते. पण तितक्यात ते स्टेजवरच कोसळले. परवा दिवशी माध्यमांशी संवाद साधताना त्यांचे हात थरथरत होते. पुढे त्यांच्या हातून माईकही खाली पडला. अशा सगळ्यात आज आता मनोज जरांगे यांची तब्येत कशी आहे? यावर स्वत: मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं. ते माध्यमांशी बोलत होते.
कालपर्यंत माझ्यात त्राण नव्हता पण समाजाने मला विनंती केल्यानं मी पाणी पितोय. आता जरा बरं वाटतंय. त्यामुळे मी तुमच्याशी बोलू शकतोय, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आम्हाला अर्धवट आरक्षण नको आहे. अर्धवट आरक्षण दिलं तर मला सांगू नका. अर्धवट कसं काय. मराठवाड्यातील भाऊ तुमचे आहेत. महाराष्ट्रातील तुमचे नाही का. मराठवाड्यातील माझे आहेत. मग पश्चिम महाराष्ट्रातील माझे नाही का. त्यामुळे सरसकट द्या. अर्धवट भूमिका नकोच. कुठूनही पुरावे घ्या. पण आरक्षण महाराष्ट्रभर द्या, अशी पुनर्मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
आमदार मुंबईकडे गेले आहेत. त्यांचं योगदान मराठा समाज विसरणार नाही. त्यांनी राजीनामा का दिले माहीत नाही. त्यांना आम्ही सांगितलं नव्हतं. त्याने काय फायदा होणरा आणि तोटा होईल माहीत नाही. आमदारकी खासदारकी असेल तर ते आळवू तरी रागतील. राजीनामे दिले तर .ते रिकामे बसतील डांबरा सारखे. आम्हीही रिकामे आणि तेही रिकामे. आत बोलायला कोणी तरी पाहिजे. हे फक्त तुटूनच पडले आहेत. योग्य असेल तर द्या राजीनामा. १० ते १५ दिवसांसाठी राजीनामे दिले तर ठिक. पण त्याचा समाजावर परिणाम होऊ नये, असं म्हणत राजकीय नेत्याच्या राजीनामा देण्यावर मनोज जरांगे यांनी भाष्य केलं आहे.
सर्व आमदार आणि खासदारांनी मुंबईतच थांबावे. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या सदऱ्याला धरून बसा. आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी गट तयार करावी. आणि मुंबई सोडू नका. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचं दार सोडू नका. त्यांच्या पाया पडा. आरक्षण मिळवून घ्या, असंही जरांगे पाटील म्हणालेत.