राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं; मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी

Manoj Jarage Patil on Special Session For Maratha Reservation : राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे मागणी केली आहे. मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले? पाहा...

राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं; मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी
Follow us
| Updated on: Oct 31, 2023 | 11:29 AM

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 31 ऑक्टोबर 2023 : राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, मराठ्यांना आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी आरक्षणावर चर्चा झाली. बाकी दुसरी काही झाली नाही. आपण त्यांना स्पष्ट सांगितलं की , नोंदीनुसार आरक्षण घ्यायला तयार नाही. समितीचा प्राथमिक अहवाल स्वीकारून महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट अधिवेश देण्याचा निर्णय घ्या. विशेष अधिवेशन बोलवा. अर्धवट आरक्षण घेणार नाही. ते तुम्ही देऊ नका. स्पष्ट शब्दात सांगितलं, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी थोड्यावेळाआधी फोनवरून बातचित केल्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

आम्ही आमच्या अभ्यासकांची १२ ते १ वाजता बैठक बोलावली. वकिलांशी चर्चा करणार आहोत. पण ८३ क्रमांकावर ओबीसीतील जाती मराठा आणि कुणबी एकच असल्याचं म्हटलंय. २००४चा जीआर आहे. तो दुरुस्त करा. कारण व्यवसायावर आधारीत जाती निर्माण झाल्या आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. त्याच धर्तीवर आरक्षण द्या. आम्ही अर्धवट आरक्षण घेणार नाही. तुम्ही कितीही बहाणे सांगितलं तरी ऐकणार नाही. असं मुख्यमंत्री शिंदे यांना आम्ही स्पष्ट सांगितलं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सगळ्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. कायदा पारित करण्यासाठी पुरावा आहे. फक्त समितीला राज्याचा दर्जा द्यायचा आहे. एका पुराव्यावरही आरक्षण देऊ शकता. तुमच्याकडे भरपूर पुरावे आहे. व्यवसाय शेती असल्याने अडचण येत नाही. कुणाचं आरक्षण कमी होणार नाही. ६० टक्के समाज ओबीसीत आहे. आम्ही थोडे आहोत. ५ कोटी मराठा आरक्षणात येत नाही. आम्ही थोडे आहोत. मराठवाडा आणि इतर भागातील आहे. ज्यांना प्रमाणपत्र हवं ते घेतील. ज्यांना नको ते घेणार नाही. कुणावर जोरजबरदस्ती नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मराठे शांत झालेत. तुम्ही पटकन आरक्षण द्या. मराठे सर्व शांत होतील का. तुम्ही अर्धवट आरक्षण देऊ नका, असंही मनोज जरांगे म्हणालेत.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.