माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडलंच म्हणून समजा; मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा

Manoj Jarange on CM Eknath Shinde Government and Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडलंच म्हणून समजा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. जरांगे नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडलंच म्हणून समजा; मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
Follow us
| Updated on: Oct 29, 2023 | 3:55 PM

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 29 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाचा लढा आता अधिक तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जसजसा वेळ पुढे सरकतोय. तसंतसं त्यांची तब्येत खालवते आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी चर्चेचं आवाहन केलं आहे. मनोज जरांगे यांनीही सरकारने चर्चेला यावं, असं प्रतिआवाहन केलं आहे. पण अद्याप सरकारकडून चर्चेसाठी सकारात्मक हालचाली होत नसल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारला ललकारलं आहे. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडलंच म्हणून समजा, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत.

मला काही झालं तरी माझा मराठा समाज आंदोलन करेल. मला काही होणार नाही. आंदोलन थांबणार नाही. माझ्या हृदयावर आणि किडनीवर परिणाम होईल असं डॉक्टर म्हणत असले तरी होऊ द्यायचा नसेल तर सरकारने ताबडतोब आरक्षण द्यावं. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचं हृदय बंद पडलंच म्हणून समजा, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला इशारा दिलाय.

सर्वांना वाटतं मला काही होणार नाही. पण कुणाला तरी जीवाला जपून चालणार नाही. एकाला तरी जीव धोक्यात घालावा लागणार आहे. तेव्हा सर्व समाजाचं कल्याण होणार आहे. आपल्याला दुखही झालं नाही पाहिजे आणि न्यायही मिळाला पाहिजे असं होत नाही. त्यामुळे कुणाला तरी दुख भोगावं लागेल. तेव्हा सगळ्यांना न्याय मिळणार आहे. तुम्ही म्हणता सरकार लक्ष देत नाही. हा फक्त दुसरा टप्पा आहे. तुम्ही थोडं थांबा तुमच्या सर्व लक्षात येणार आहे. शेवटी त्यांना आरक्षण द्यावंच लागणार आहे, असं म्हणत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षण सरकारला इशारा दिलाय.

आता सरकारला येऊ द्या. त्यांना रस्ता देऊ. मला बोलता येतं तोपर्यंत या. माझे मराठे तुम्हाला अवडणार नाही. पण माझी बोलती बंद झाली आणि तुम्ही नाटक म्हणून आले तर मराठे तुम्हाला बेजार करतील. हे तितकंच खरं आहे. तुम्ही आज उद्या या. आज उद्या मला शंभर टक्के चांगलं बोलता येऊ शकतं हे माझं शरीर मला सांगतं. छत्रपतींच्या पायाला हात लावला की मला दोन चार तास ऊर्जा मिळते, असंही मनोज जरांगे म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.