कागदपत्र तयार ठेवा, 3 दिवसात अर्ज…; मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन, जरांगे निवडणूक लढणार?

Manoj Jarange on Vidhansabha Election 2024 : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं. मराठा समाजाला मनोज जरांगे यांनी महत्वाचं आवाहन केलं आहे. जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर...

कागदपत्र तयार ठेवा, 3 दिवसात अर्ज...; मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन, जरांगे निवडणूक लढणार?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 2:42 PM

कालच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली गेली आहे. यानंतर आता राज्यात निवडणुकीचं वार वाहतं आहे. अशातच आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. जालन्यात मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवाहन केलं आहे. कागदपत्र तयार ठेवा, असं जरांगे म्हणालेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशातच आता मनोज जरांगे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 20 तारखेला मनोज जरांगेंनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

निवडणूक लढण्याबाबत बैठक होणार

20 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता बैठक सुरू होईल. संध्याकाळी 4 वाजता ती बैठक संपन्न होईल. त्यादिवशी आपल्याला लढायचं की पडायचं हा निर्णय घ्यायचा आहे. पण मराठ्यांनी आतापासूनच सावध राहायचं आहे. सगळ्यांनी कागद पत्रासह सगळ्यांनी तयार राहा. जर लढायच ठरलं तर तुमच्याकडे 3 दिवस अर्ज भरण्यासाठी राहणार आहेत. जर या निवडणुकीत पडायचं ठरलं तर तुमचे कागद पत्र यावं जाणार आहेत. सगळ्यांनी 20 तारखेला अंतरवाली सराटीत डबे घेऊन या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.

चर्चा करून ठरवायचं; जरांगे काय म्हणाले?

ज्यांनी निवडणुकीसाठी अर्ज केले आहेत, त्यांच्या सोबत मला चर्चा करायची आहे. उद्या महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांनी अंतरवाली सराटीत यावं. सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजे पर्यंत चर्चेसाठी यावं. 2- 3 विषयांवर मला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. रविवारी 20 तारखेला मराठा समाजाची बैठक होणार आहे. त्या बैठकीला ज्याला जमेल त्याने यावं, कोणाला ही बळजबरी नाही. मला माझ्या समाजाला खर्चात टाकायचं नाही. पण वेळ आली तर आपल्याला लढावं लागेल, असं मनोज जरांगे म्हणालेत.

शक्ती प्रदर्शन आता करायची गरज नाही. ही बैठक घेऊन मला कोणावर दबाव निर्माण करायचा नाही. ज्यांना शक्य असेल त्यांनी अंतरवाली सराटीत 20 तारखेला चर्चेला यावं. एकदा जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय मागे घेतला जाणार नाही, असं जरांगे म्हणाले.

Non Stop LIVE Update
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कायक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कायक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.
लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधक गडबडले - अजित पवार
लाडकी बहीण योजनेच्या यशामुळे विरोधक गडबडले - अजित पवार.
टोल माफ करण्याची मागणी आमचीच - राज ठाकरे
टोल माफ करण्याची मागणी आमचीच - राज ठाकरे.
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ.
अमित शाह, भाजपचा कोणताही त्याग नाही - संजय राऊत
अमित शाह, भाजपचा कोणताही त्याग नाही - संजय राऊत.