10 टक्के आरक्षण मनोज जरांगेंना मान्य नाही; म्हणाले, हे अजिबात चालणार नाही…

Manoj Jarange Patil Maharashtra State Backward Class Draft Assembly Session Maratha Aarakshan Adhiveshan 2024 : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याचा राज्य मागासवर्गाच्या अहवालात उल्लेख आहे. पण हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. वाचा...

10 टक्के आरक्षण मनोज जरांगेंना मान्य नाही; म्हणाले, हे अजिबात चालणार नाही...
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 11:41 AM

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवली सराटी, जालना | 20 फेब्रुवारी 2024 : राज्य मागासवर्गाचा अहवाल समोर आला आहे. यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याची तरतूद आहे. मात्र हे दहा टक्के आरक्षण मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मान्य नाही. सगेसोयरे शब्दाची अंमल बजावणी करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील मागच्या बऱ्याच दिवसांपासून करत आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारने अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मनोज जरांगे यांनी सरकावर हल्लाबोल केलाय.

जरांगेंची भूमिका काय?

मराठा आरक्षणासंदर्भातील या विशेष अधिवेशनात राज्य मागासवर्ग आयोग जो अहवाल सादर करणार आहे. तो अहवाल टीव्ही 9 मराठीच्या हाती लागला आहे. यात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र हे 10 टक्के आरक्षण मराठा समाजाचं नुकसान करणारं आहे. या आरक्षणाचा मराठा समाजाला काहीही उपयोग होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे अजिबात चालणार नाही- जरांगे

सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी केली पाहिजे, याची आम्ही मागणी केली आहे. करोडो मराठा बांधवांची मागणी आहे, की ओबीसीतून आरक्षण द्या. त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. वेगळ्याच गोष्टी समोर आणता, हे अजिबात चालणार नाही. सगे सोयरे शब्दाची अंमलबजावणी पाहिजे. नाहीतर उद्या आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तर पुन्हा आंदोलन- जरांगे पाटील

सरकारने सगळी प्रक्रिया केली आहे, हे खरं आहे. पण, ओपन कोर्टात curative petition ची hearing होणार आहे का? ओपन कोर्टात झालं नाही तर झालं मराठ्यांच्या नुकसान होणार आहे. हे फक्त ठिगळं देणं सुरू आहे. नोंदी सापडल्या आहेत म्हणाल्यावर त्यांना टेन्शन आहे का? आरक्षण देऊन टाका. समाज डोक्यावर घेऊन नाचेल. नाही तर आंदोलन अटळ आहे. पुढचं आंदोलन उद्या बघू. त्यांना जाम पुन्हा बघायचा म्हणाल्यावर उद्या बघू ना…त्यांना देणं घेणं नाही. राज्यातले एक नागरिक उपोषण करून मरो, आत्महत्या करो. पण मी माझाच तोरा गाजवणारा, अशी जर मग्रुरी असेल तर आम्ही मराठा आहोत. पुन्हा रस्त्यावर उतरवायला वेळ लागणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.