विशेष अधिवेशनाआधी मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; अंतरवली सराटीतून पत्रकार परिषद

Maharashtra Assembly Adhiveshan on Maratha Aarakshan : मराठा आरक्षणासंदर्भात आजपासून विशेष अधिवेशन होत आहे. या आधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत पत्रकार परिषद घेतली. ते काय म्हणाले? वाचा सविस्तर...

विशेष अधिवेशनाआधी मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; अंतरवली सराटीतून पत्रकार परिषद
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 8:29 AM

संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवली सराटी, जालना | 20 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनाआधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली. सगेसोयरे अंमलबजावणी आधी करावी. मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार आरक्षण दुसऱ्या सत्रात घ्यावं. ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्या आरक्षणासाठी सरकारने अधिसूचना काढली होती. त्याची अंमलबजावणी करावी. सगळे आमदार, मंत्री यांनी हा विषय लावून धरावा, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तातडीने मराठा समाजाला आरक्षण द्या- जरांगे

ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण ही मागणी लावून धरावी. मागणी वेगळी आणि तुम्ही वेगळं करताय. हे मराठा बघेल आणि तुम्ही मराठा विरोधी हे लक्षात येईल. कोण काय बोलतं याकडे समाजाचं लक्ष आहे. आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारला सुद्धा माहिती आहे. डबल माहिती करून घेऊ नका. आज करोडो मराठ्यांची मागणी आहेत. आमचं आलेलं ओबीसी आरक्षण द्या. या अधिवेशनात हा विषय तातडीने घ्या, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांची मागणी काय?

नव्या आरक्षणाने न्याय का मिळणार नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यावर मनोज जरांगे यांनी आपलं मत मांडलं. ती मागणीच नाही ना… कसा न्याय मिळेल? या आधी काय झालं? आरक्षण मिळालं, शिकले, निवड झाली. एक उदाहरण सांगतो. एससीबीसीमधून एका विद्यार्थ्याची निवड झाली. गावाने वाजतगाजत मिरवणूक काढली. ते अजून गावीच गेलं नाही, कारण नियुक्ती मिळाली नाही. त्याचं जमलेलं लग्न अजून झालं नाही. त्यामुळे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या, असं मनोज जरांगे म्हणालेत.

हा विषय तातडीने घ्या-जरांगे

विविध मागण्यांमध्ये सगे सोयरे येऊ शकतं हीच एक आशा आहे. याला फोडून पक्षात आणणं, कोणाला फोडणं, कोणाच्या केसेस मागे गेल्या याला विविध मागण्या म्हणत नाहीत. आमच्या मागण्या विविध मागण्या आहेत. आंदोलन किती महत्त्वाचं आहे हे सरकारला सुद्धा माहिती आहे डबल माहिती करून घेऊ नका. आज करोडो मराठ्यांची मागणी आहे आमचं आलेलं ओबीसी आरक्षण द्या. या अधिवेशनात हा विषय तातडीने घ्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.