सरकारला माझ्या भावाला सिरियस करायचंय,पण मी त्याला असं बघू शकत नाही; जरांगेंच्या भेटीला आलेल्या आरोग्यसेविकेला रडू कोसळलं
Nurse on Manoj Jarange Patil Health : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आरोग्यसेविका पोहोचल्या. त्यांनी मनोज जरांगे यांना उपचाराची गरज असल्याचं म्हटलं आहे. मी इथंच जीव देईन, माझ्या भावाचा इलाज केल्याशिवाय मी घरी जाणार नाही, असं म्हणत त्या रडू लागल्या.
संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जालना | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्यात मोठा लढा उभारला आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या उपोषण करत आहेत. त्यांच्या या तिसऱ्या टप्प्यातील उपोषणचा आज सहावा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या भेटीसाठी आरोग्यसेविका पोहोचल्या. यावेळी जरांगे पाटील यांना उपचारांची गरज असल्याचं म्हटलं. पण हे सांगत असतानाच त्या आरोग्यसेविकेला आपले अश्रू रोखता आले नाहीत. त्यांना रडू कोसळलं. रडत रडत त्यांनी मनोज जरांगे यांना उपचारांची गरज असल्याचं म्हटलं.
मनोज जरांगे हे उपोषणाना बसलेत. त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून लोक येत आहेत. अशात एक आरोग्यसेविका त्यांना भेटण्यासाठी आली. तेव्हा मनोज जरांगे यांची अवस्था पाहून त्यांना रडू कोसळलं. मी इथंच जीव देईन, माझ्या भावाचा इलाज केल्याशिवाय मी घरी जाणार नाही, असं म्हणत त्या रडू लागल्या.
ठरवलं तर सरकार बैठक घेईन निर्णय घेऊ शकतं. पण सरकार तसं करत नाहीये. सरकारला माझ्या भावाला सिरियस करायचंय. सरकार मनोज जरांगे पाटील यांना असं निपचित पडलेलं बघू शकतं. पण मी माझ्या भावाला असं बघू शकत नाही. मनोज जरांगे जरी माध्यमांशी बोलत असले तरी त्यांची प्रकृती खालावते आहे. त्यांना उपचारांची गरज आहे. मी कुणाचंही ऐकणार नाही. त्यांनी मला मारलं तरी चालेल. मी त्यांचा मार खाईन. पण मी त्यांना दवाखान्यात घेऊन जाणार. त्यांना आयसीयूमध्ये अॅडमिट करणार, असं त्या आरोग्यसेविका यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणचा लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावते आहे. काल माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांच्या हातून माईकही खाली पडला. सध्या मनोज जरांगे हे उपोषण स्थळी झोपून आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. आज मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठक होणार आहे. या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलवली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्राला आवाहन करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.