पोलीस बदलीच्या यादीतील नावासमोर चक्क गुंड, वाळू तस्कर म्हणून ताशेरे! जालन्यात पोलीस बदलीची यादी चर्चेत
Jalna Police Transfer News : पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करताना बदल्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत असते. परंतु जालना पोलीस दलात याला हरताळ फसण्यात आलाय.
जालना : जालना जिल्ह्यातील (Jalna Police Transfer News) 180 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या सध्या चांगल्याच गाजत आहेत. त्याला कारणही तसंचय. पोलिसांच्या (Police News) करण्यात आलेल्या सर्व बदल्या लोकप्रतिनिधी आणि गुत्तेदार यांच्या शिफारशी वरून करण्यात आल्याचा समोर आलंय. एवढंच नाही तर ज्या पोलिस कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यांच्या नावासमोर चक्क गुंड, वाळू तस्कर, बरा असा उल्लेख करण्यात आल्याचा धक्कादायक शेरे असल्याचा एक फोटोही समोर आलाय. पोलीस बदल्यांच्या यादीचा हा फोटो व्हायरल झालाय. या बदल्यामध्ये बहुतांशी पोलीस कर्मचाऱ्यांनी स्थानिक गुन्हे शाखेत बदली हवी आहे, अशी मागणी केल्याचं या फोटोतून दिसून आलंय. पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करताना बदल्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत असते. परंतु जालना पोलीस (Jalna Police) दलात याला हरताळ फसण्यात आलाय.
कुणाच्या नावार समोर काय?
जालना जिल्ह्यातील पोलीस बदल्यांच्या यादीमध्ये पोलीस कॉन्स्टेबल चंपलाल गुसिंगे यांच्या नावासमोर वाळू तस्कर, जे.जे. दिलवाले यांच्या नावासमोर बोगस तर काही पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गुड आणि बरा असा शेर देण्यात आला आहे.
एकूण 20 पोलिसांची नावं यादीत दिसून आली आहे. त्यांनी सहा जणांची नावं गुलाबी रंगाच्या हायलायटरने ठळक करण्यात आली आहेत. तर अन्य सहा जणांची नावं पिवळ्या रंगाच्या हायलायटरने ठळक करण्यात आली आहेत. तर सात जणांच्या नावासमोर फुल्ल्या मारण्यात आल्या आहेत.
पैसे देऊन पोलिसांच्या बदल्या?
सचिन वाझे प्रकरणानंतर पोलिस बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा सनसनाटी आरोप करण्यात आला होता. पैसे देऊन पोलीस बदल्या केल्या जात असल्याचं प्रकरण चर्चेत आलेलं असतानाचा आता जालन्यातून समोर आलेल्या पोलीस बदल्यांच्या यादीनं खळबळ उडवून दिली आहे. जालना जिल्ह्यात पोलीस बदल्यांच्या प्रकरणी व्हायरल झालेल्या यादीनं चर्चांना उधाण आलंय.