Jalna | उलटा चोर कोतवाल को डाटे, Raosaheb Danve यांच्या वक्तव्याची Abdul Sattar यांच्याकडून खिल्ली
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार म्हणाले, भाजपचेच आमदार नाराज असून त्यांचे 25 आमदार फुटू नये म्हणून दानवे खोटं बोलत आहेत.
जालनाः भाजप नेते रावासाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचं नाराज आमदारांबाबतचं वक्तव्य म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे, या म्हणीसारखं आहे, असा टोला शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी लगावला आहे. महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi MLA) 25 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र त्यांची आमदारकी धोक्यात येऊ नये, म्हणून नावे उघड करत नाहीये, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी काल केलं होतं. या वक्तव्यावरून शिवसेना नेत्यांच्या तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत. खासदार संजय राऊत यानंतर आता जालन्यातले शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनीही या विषयात प्रतिक्रिया दिली. भाजपचेचे 25 आमदार महाविकास आघाडी सरकारच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट सत्तार यांनी केलाय.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार म्हणाले, भाजपचेच आमदार नाराज असून त्यांचे 25 आमदार फुटू नये म्हणून दानवे खोटं बोलत आहेत. भाजपचेच 25 नाराज आमदार महाविकास आघाडीत प्रवेश करणार असल्याचे सत्तार म्हणाले. दानवे यांचा गौप्यस्फोट म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे.. असंत आहे, अशी खिल्ली सत्तार यांनी उडवली. आज जालन्यात पंचायत समिती कार्यालयाचे सत्तार यांच्या हस्ते लोकार्पण झाले त्यांनतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
MIM चा निर्णय वरिष्ठ घेतील- सत्तार
दरम्यान, एमआयएमने महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी केलेल्या मोठ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार म्हणाले, एमआयएमने महाविकास आघाडी सरकारमध्ये यावं की नाही, याबाबत मी प्रतिक्रिया देणार नाही. याबाबतचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील.
रावसाहेब दानवे यांचं काय वक्तव्य?
महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असून ते आमच्या संपर्कात आहेत असा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना केला. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मविआमधील 25 आमदार बहिष्कार घालणार होते. पण त्यांची कशीबशी समजूत काढली गेली, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
इतर बातम्या-