इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, त्यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा…

Shrimant Kokate Meets Manoj Jarange Patil : इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी काही पुस्तकं श्रीमंत कोकाटेंनी मनोज जरांगे पाटील यांना भेट दिली. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर संवाद झाला. वाचा सविस्तर...

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे मनोज जरांगेंच्या भेटीला; म्हणाले, त्यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा...
श्रीमंत कोकाटे आणि मनोज जरांगेंची भेटImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 1:05 PM

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी जालन्याला जात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 1 ऑगस्टला जरांगेंचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त श्रीमंत कोकाटे यांनी दिल्या जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिला. श्रीमंत कोकाटे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाली. काल सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगेंची भेट घेतली. या भेटीतील मुद्द्यांवर या दोघांमध्ये चर्चा झाली. यावेळी काही पुस्तकं श्रीमंत कोकाटे यांनी मनोज जारांगे पाटील यांना भेट दिली. जरांगे पाटील यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा माणसं जास्त वाचली आहेत, असं श्रीमंत कोकाटे म्हणाले.

कोकाटे-जरांगे यांची भेट

इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी श्रीमंत कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना भेटीतील मुद्द्यांवर भाष्य केलं. मनोज जरांगे पाटील यांची भेट घ्यावी, अशी खूप दिवसापासून इच्छा होती. मात्र आंदोलनामुळे आणि त्यांच्या दौऱ्यामुळे भेट घेता आली नाही. अखेर आज त्यांची भेट घेतली. त्यांना संत तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली. तर इतर महापुरुषांची पुस्तके देखील भेट दिली आहेत, असं श्रीमंत कोकटे म्हणाले.

जरांगेंना पुस्तकं भेट

मनोज जरांगे पाटील यांनी पुस्तक वाचण्यापेक्षा माणसं जास्त वाचली आहेत. त्यांना मी तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली आहे. त्यामध्ये ‘बरे झाले देवा कुणब्याच्या घरी जन्माला आलो’ हा अभंग आहे. तर गाथ्यामध्ये तुकाराम महाराजांनी अनेक वेळा उल्लेख केला आहे. की मी कुणब्याचा आहे. आताच्या तुकाराम महाराजांचे जे वंशज आहेत. मोरे ते मराठा असले तरी तुकाराम महाराज स्वतःचा उल्लेख कुणबी असा करतात. त्यामुळे आजचा मराठा हा कुणबी आहे आणि कुणबी आणि मराठा काही वेगळे नाही, हे जरांगे पाटील यांचे म्हणणं आहे, असं यावेळी श्रीमंत कोकाटे म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधान धक्कादायक आणि आश्चर्यजनक आहे. प्रकाश आंबेडकर देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अभ्यास आहे. समाज जोडण्यासाठी ते भूमिका घेत असतात. मात्र अशावेळी त्यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानांमध्ये राजकारण पाहायला मिळतं, ते तोडण्याची कधी भूमिका घेत नाहीत. मराठा समाजापासून ओबीसीला काही धोका नाही. महात्मा फुले देखील आपल्या एका पुस्तकात सांगतात की सर्व मराठा आहेत. आपण सगळे भावंडं आहोत. त्यापासून एकमेकांना काही धोका नाही, असंही श्रीमंत कोकाटे यावेळी म्हणाले.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.